सांगोला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षाला बदली
सांगोला :- सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची तडकाफडकी सोलापूर येथील नियंत्रण कक्षाला बदली झाली असून निंबाळकर यांच्या तडकाफडकी बदली झाल्याने हे भगवान ये कैसे हो गया अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व अधिकारी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत. सांगोला शहर व तालुक्यात मोठा गाजावाजा करून गावगुंडांना सावधान असे डिजिटल बोर्ड लावून गुन्हेगारांना दम देणाऱ्या भगवान निंबाळकर यांच्यावरच तडकाफडकी बदली होण्याची वेळ कशी काय आली?याविषयी अनेक चर्चांना उधाण आले आहे. सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून भगवान निंबाळकर यांनी कायद्याचा धाक निर्माण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या बाजूने सांगोला शहर व तालुक्यात खुलेआम चालू असलेला मटका, मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा, अवैद्य दारू विक्री, जुगाराचे अड्डे यावर मात्र कोणत्याही प्रकारची मोठी कारवाई त्यांनी केले नाही असे दिसून आले. केवळ बोर्ड लावून उपयोग नसतो तर दोन नंबर वाल्यांना त्यांच्या मुसक्या आवळून त्यांचे धंदे बंद करण्याचे मात्र त्यांनी टाळले,त्यामुळे एकीकडे सांगोल्याचे पोलीस कारवाई करत होते तर दुसरीकडे मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून दोन नंबर धंदे खुलेआमपणे बिनबोभाट सुरू असल्याने दोन नंबर धंदे वाले आणि पोलीस प्रशासन यांच्यामधील संबंध कशा प्रकारचे आहेत, याविषयी खुलेआमपणे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात होते. तरीपण भगवान निंबाळकर यांची तडकाफडकी बदली होणे यामागे काहीतरी खासगी कारण असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ज्या भगवान निंबाळकर यांनी सांगोला शहर व तालुक्यात डिजिटल बोर्ड लावून गावगुंडांना सावधान असा इशारा गुन्हेगारांना दिला त्याच भगवान निंबाळकर यांची सांगोला पोलीस स्टेशनची कारकीर्द खूपच अल्प का राहिली व तडकाफडकी त्यांची बदली झाल्याने यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? याचीही खुमासदार चर्चा सध्या सांगोला शहर व तालुक्यात सुरू आहे.
0 Comments