रमजान ईद निमित्त घरातच नमाज पठण करावे-पत्रकार मिनाज खतीब.
सांगोला (प्रतिनिधी) : मुस्लिम समाजात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करून मोठ्या उत्साहाने रमजान ईद हा सण साजरा करतात आपले मित्र-परिवार व नातेवाईकांसोबत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणारी रमजान ईद यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे साधेपणाने साजरी करावी सध्याच्या परिस्थिती मध्ये संपूर्ण जगभरामध्ये तसेच आपल्या भारत देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून शासनाने लॉकडाऊन केला आहे.
व साधेपणाने रमजान ईद घरात साजरी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत तरी कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत ईद च्या दिवशी मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मिनाज खतीब यांनी केले आहे.
0 Comments