रमजान सणाच्या खरेदीसाठी एक दिवस जनता कर्फ्यूमध्ये शिथिलता द्यावी : नगरसेवक सुरजदादा बनसोडे
सांगोला प्रतिनिधी : रमजान ईद या सणासाठी मुस्लिम बांधवांना किराणा सामान खरेदी करता यावे यादृष्टीने प्रशासनाने जनता कर्फ्यू मध्ये वेळेचे बंधन देऊन शिथीलता द्यावी व त्यांच्या आदर युक्त भावनांचा विचार करावा अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी केली आहे.मुस्लिम समाजातील दोनच सण महत्त्वाचे आहेत. त्यात रमजान ईद हा सण सर्वात मोठा सण समजला जातो. या सण आणि उत्सव काळात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. विषाणु ची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन व संचार बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान रुग्ण संख्या वाढतच असल्याने प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन जनता कर्फ्यू चा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व समाजातून व नागरिक व्यापाऱ्यांकडून पालन केले जात आहे. परंतु मुस्लिम समाजाने ईद या सणासाठी कोणतीही खरेदी केली नाही. परंतु किमान ईद साठी लागणारा किराणा सामान तरी खरेदी करता यावे. आणी पारंपारिक खाद्यपदार्थ तयार करून घरगुती ईद साजरी करण्यासाठी याकरिता नियमात शिथिलता द्यावी. आणि मुस्लीम बांधवांना शासनाच्या नियमांचे पालन करून सण साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी. यामध्ये ईद हा सण 13 किंवा 14 मे रोजी होईल याबाबत अंदाज नसल्यामुळे एक दिवसापूर्वी म्हणजेच 12 मे रोजी परवानगी देण्यात यावी अशीही मागणी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे केली आहे.
0 Comments