google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शासनाचा एकतर्फी आदेश जनतेवर उपासमारीची वेळ आणणारा - चेतनसिंह केदार-सावंत लॉकडाऊन पर्याय नाही, निर्बंध कडक करण्याची मागणी

Breaking News

शासनाचा एकतर्फी आदेश जनतेवर उपासमारीची वेळ आणणारा - चेतनसिंह केदार-सावंत लॉकडाऊन पर्याय नाही, निर्बंध कडक करण्याची मागणी

 शासनाचा एकतर्फी आदेश जनतेवर उपासमारीची वेळ आणणारा - चेतनसिंह केदार-सावंत लॉकडाऊन पर्याय नाही, निर्बंध कडक करण्याची मागणी


सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, एकमेकांपासून अंतर, सॅनिटायझर अशा त्रिसूत्री उपायांचा अवलंब करत बाजारपेठा, सर्व व्यवहार सुरू ठेवावेत. अचानक पंचवीस दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे.  नागरिक, व्यापारी नियम पाळत असताना शासनाचा एकतर्फी आदेश जनतेवर उपासमारीची वेळ आणणारा आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून प्रशासनाने कडक निर्बंध लागू करून सकाळी सात ते रात्री सातपर्यंत सर्व व्यवहार, व्यवसाय, बाजारपेठा सुरू ठेवाव्यात अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे सोमवारी अचानक रात्री शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापने बंद राहणार असे लॉकडाऊनचे आदेश काढले आणि सकाळी बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनच्या विरोधात सर्वसामान्य जनतेसह, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

कोविड प्रतिबंधक लस निघाली असून लसीकरण सुरू आहे. तरीही प्रतिबंधक नियमाची अंमलबजावणी करण्याऐवजी शासनाने सरसकट बाजारपेठ बंद ठेवायला सांगितल्याने शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या संसर्ग लाटेचा संदर्भ देऊन शासनाने केलेला लॉकडाऊन जनतेवर अन्याय करणारा आहे गेल्या वर्षात दुकानभाडे, वीजबिल, जीएसटीसह विविध कर, कर्जाची परतफेड करावीच लागली. यात शासनाने ना वीज बिल माफ केले, ना कोणत्या करात सूट दिली. तरीही शासनाने एकतर्फी लॉकडाऊन लागू केल्याने अनेक व्यवसाय बुडणार हे निश्चित आहे. अगोदरच महागाई वाढली असून खर्चाचा ताळमेळ बसत नसताना लॉकडाऊन लावल्यास शेतकरी, सर्वसामान्य जनता, व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे आता सरसकट व्यवहार, व्यवसाय बंद करण्याऐवजी कडक निर्बंध लावून नियम पाळत व्यवसाय, व्यापार सुरू ठेवायला पाहिजे अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे. राज्यातील जनता, व्यापारी, व्यावसायिक, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर करून शासनाने जनतेची दिशाभूल केली आहे. शासनाने कोरोनाची नियमावली तयार करताना सर्वसामान्य माणूस कसा जगेल हे पाहिले नाही. शासनाने मिनी लॉकडाऊन करू असे सांगून कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून सशेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा निर्णय आहे. यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने मरण्यापेक्षा आत्महत्या करून मरू अशी नागरिकांची मानसिकता झाली आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू करून व्यवहार, व्यवसाय सुरू करावेत अशी मागणी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments