google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीम जयंती उत्साहात साजरी करणारच, पण घरात नाही. नगरसेवक सुरजदादा बनसोडे

Breaking News

भीम जयंती उत्साहात साजरी करणारच, पण घरात नाही. नगरसेवक सुरजदादा बनसोडे

 भीम जयंती उत्साहात साजरी करणारच, पण घरात नाही. नगरसेवक सुरजदादा बनसोडे 


 गुन्हे दाखल करायचे असतील तर अगोदर पंढरपूर, मंगळवेढा पोट निवडणुकीमध्ये कोरोनाचे नियम मोडनारे मंत्री , खासदार, आमदार, व इतर राजकीय नेते मंडळीवर करावेत.  

सांगोला   दिनांक :-  संपूर्ण जगभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते, परंतु गेल्यावर्षीपासून  कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध लादल्यामुळे गेल्यावर्षी सदरची जयंती घराच्या घरी साजरी करून शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन केले,  या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीसारखी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे भीमसैनिकांनी ठरविले होते परंतु पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीमध्ये उपमुख्यमंत्री , मंत्री, खासदार , आमदार व नेते मंडळी मग ते सत्ताधिकारी पक्षाचे असो किवा विरोधी पक्षाचे असो त्यांनी शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून निवडणूक सभा,  पदयात्रा, मेळावे हे प्रचंड गर्दी करून पार पाडले. परंतु ह्या नेतेमंडळीवर कसलाच गुन्हा दाखल केला नाही , मग निवडणुकीच्या गर्दीत कोरोनाची लागण होत नाही का ? वास्तविक पाहता मंत्रालया मध्ये जे मंत्री कोरोनाचे नियम लागू करतात ते नियम मंत्री व नेतेमंडळी यांना लागू होत नाहीत का  ?  मग  हे नियम सर्वसामान्य जनतेवर नियमांचा बडगा कशासाठी ?  वास्तविक पाहता शासनाच्या या नियमामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. कोरोनाची भीती  धाकवून फक्त सर्वसामान्य व्यापारी, मजूर व इतर उद्योग धंद्यांना नाहक त्रास कशासाठी ?  महापुरुषांच्या कार्यक्रमापेक्षा राजकीय पक्षाचे कार्यक्रम महत्वाचे नाहीत. सदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा दरम्यान कोरोनाचे काही नियम क्षीतील करण्या संदर्भात सांगोला तहसिलदार व पोलीस अधिकारी यांना ३१ मार्च रोजी लेखी निवेदन दिले होते त्या अनुषंगाने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये ५ एप्रिल रोजी जयंती साजरी करणे संदर्भात सागोल्याचे पोलीस निरीक्षिक यांनी काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची  बैठक आयोजित केली होती . परंतु सदरच्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही म्हणून पोलीस निरीक्षक साहेब यांनी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना चर्चेला बोलावितो असे सांगितले. शिवाय त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला त्यांनी ६ एप्रिल ची  वेळ दिली होती  परंतु त्या आल्या नाहीत. त्यामुळे चर्चेचा प्रश्नच उरला नाही. म्हणून  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागासह मोठ्या उत्साहात साजरी होणारच. सदर जयंतीमध्ये प्रशासकीय बाब निर्माण झाल्यास त्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे शासनाने आंबेडकरी जनतेच्या  सहनशीलतेचा अंत पाहू नये. तरी प्रशासनाने ताबडतोप उपविभागीय प्रांताधिकारी मंगळवेढा व पोलीस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्या समवेत आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकारी यांच्याशी बैठक आयोजित करून लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आंबेडकरी जनता  राज्यकर्त्या शासनाच्या विरोधात १८५७ ला बंड झाले होते त्यानंतर हे २०२१ चे दुसरे बंड करण्यास शासनाने प्रवृत्त करू नये .

Post a Comment

0 Comments