google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पंचायत समितीमध्ये कोरोना ! दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

Breaking News

सांगोला पंचायत समितीमध्ये कोरोना ! दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

 सांगोला  : कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे . या पार्श्वभूमीवर शासन आदेश 27 मार्च 2021 मधील निर्देशानुसार पंचायत समिती , सांगोला कार्यालय 1 एप्रिल रोजी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे . पंचायत समिती कार्यालयात 0 तालुक्यातील ग्रामीण भागातून दररोज अनेकजण कामानिमित्त येत असतात . कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यामुळे आता पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करता येणार नाही .


अशातच दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे .  1 एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची कोव्हिड टेस्ट घेण्यात आली . एकूण 69 टेस्ट घेण्यात आल्या असून त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यालयात चिंतेचे निर्माण झाले आहे . तसेच यापुढे दररोज पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कोव्हिड चाचणी केली जाणार आहे . तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी अत्यावश्यक कामाशिवाय पंचायत समिती कार्यालयात येऊ नये , आपले अर्ज , निवेदन किंवा ई - ऑनलाइन पाठवून द्यावेत . आपल्या अर्जावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल , असे आवाहन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे . कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे . त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे . कार्यालयातील अधिकारी , कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांना सुद्धा कोव्हिड टेस्ट केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला नाही .संतोष राऊत , गटविकास अधिकारी , पंचायत समिती , सांगोला आधी केले , मग सांगितले पंचायत समितीच्या सभापती राणी कोळवले व गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी काल कार्यालयात येताच आपल्या कोव्हिड चाचण्या करून घेतल्या . तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा चाचणी करून घेण्याची सूचना केली . त्यानुसार एका दिवसात 69आपल्या कोव्हिड चाचण्या करून घेतल्या . तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा चाचणी करून घेण्याची सूचना केली . त्यानुसार एका दिवसात 69 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या . गटविकास अधिकारी संतोष राऊत व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोव्हिड लसीकरणाचे दोन्ही डोससुद्धा घेतले आहेत . नागरिकांनीसुद्धा कोव्हिड चाचणी करण्यास व लसीकरण करण्यात प्रशासनाला सहकार्य करावे , अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे 

Post a Comment

0 Comments