लॉकडाऊनची शक्यता असली तरी गुढीपाडव्याला परवानगी : ठाकरे सरकारकडून ‘हि’ खास नवी नियमावली जाहीर
अध्यात्मिकइतर मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे.मराठी नवीन वर्ष उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजर केल जाणार आहे. पण, यंदाच्या वर्षीही गुढीपाडवा हा घरातच साजरा करावा लागणार आहे. सरकारच्या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.
0 Comments