सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : केंद्र व राज्य सरकारच्या श्रावणबाळ , निराधार , वृद्धापकाळ , विधवा अशा विविध योजनेतील व १४ सप्टेंबर २०२० पूर्वी मंजूर झालेल्या सुमारे १६ हजार २६४ लाभार्थ्यांचे सुमारे ५ कोटी ९ ८ लाख ८ ९ हजार २०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे .
येत्या १२ एप्रिल पर्यंत त्या- त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल असे सांगून ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचे दाखले जमा केले नाहीत त्यांनी तात्काळ हयातीचे दाखले जमा करावेत असे आव्हान तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले . राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध आठ योजनेच्या माध्यमातून दिव्यांग , निराधार , वयोवृद्ध पात्र लाभार्थ्यांना दर माहे पेन्शन देवून आधार दिला आहे . सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवरच या लाभार्थ्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो . मात्र गेल्या नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सलग ७ महिने केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान प्रलंबित होते . त्यामुळे पेन्शनवर जगणाऱ्या उपासमारीची वेळ आली होती . पेन्शन मिळावी म्हणून लाभार्थी तहसील कार्यालयाकडे हेलपाटे मारीत होते . सांगोला तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर २३ मार्च रोजी सात महिन्याचे सुमारे५ कोटी ९ ८ लाख ८ ९ हजार २०० रुपये प्राप्त झाले आहेत . दरम्यान १४ सप्टेंबर २०२० नंतर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे शासनाकडून अनुदान झाले नसल्यामुळे त्यांना पेन्शन मिळणार नाही .
0 Comments