महाराष्ट्रात आगामी 4 दिवस विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रात गेले काही दिवस तापमानाची तीव्रता अधिक असल्याने उन्हाचा चटका लागत होता. दिवस रात्रीही गर्मी निर्माण झाली होती. आता मात्र तापमानामध्ये बदल झाला आहे. तापमानाची तीव्रता कमी होऊन काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. असे ढगाळ वातावरण कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाडा या ठिकाणी दिसत आहे. यावरून आगामी ४ दिवस राज्यातील संकीर्ण जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तर ८ एप्रिलपासून, ते १२ एप्रिल पर्यंत या कालावधीत हवामान कोरडे, विजांचा कडकडाटासह तुरळक पाऊस पडणार आहे, तर हा पाऊस कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागात पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे ८ एप्रिलला आज कोकणामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ९ एप्रिलला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. अशी शक्यता आहे. तसेच, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.तर विदर्भात काही ठिकाणावर पाऊस पडून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
0 Comments