सांगोला प्रतिनिधी :-सांगोला नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत . शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्याचा मनसुबा जाहीर केला आहे .
त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष , भाजप , आरपीआयसह आनंद माने गट व इतर पक्ष काय भूमिका घेणार , याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे . सांगोला नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीत शेकाप , राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या शहर विकास आघाडी विरुद्ध शिवसेना , भाजपवइतर पक्षांची महायुती अशी निवडणूक झाली होती . यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा राणी माने बहुमताने निवडून आल्या , तर महायुतीचे ८ नगरसेवक निवडून आले होते . विरोधात शेकाप , राष्ट्रवादी , काँग्रेसच्या शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक निवडून आले होते . १ अपक्ष असे सध्याचेबलाबल आहे . तालुक्यात स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक नेत्यांनी पक्षनिष्ठा , गट , तट खुंटीला टांगून रातोरात दलबदलूपणा केला आहे . आजचे राजकीय शत्रू उद्या मित्रही होऊ शकतात . हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे . असे असले तरी येणारी नगरपरिषद निवडणूक तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे . सांगोला नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे . मागील नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष व प्रभाग पद्धत होती . आता वार्डनिहाय निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे व वाढीव लोकसंख्येमुले नवीन २ वार्ड वाढणार आहेत . गेल्या आठवड्यात शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांची बैठक झाली . यामध्ये महाविकास आघाडी नगरपरिषद निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार है निश्चित झाले आहे .
0 Comments