google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलिस निरीक्षक निंबाळकरांची दबंगगिरी ! सांगोल्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणखी दोघांना केले जिल्ह्यातून तडिपार

Breaking News

पोलिस निरीक्षक निंबाळकरांची दबंगगिरी ! सांगोल्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणखी दोघांना केले जिल्ह्यातून तडिपार

 सांगोला ( सोलापूर ) : सांगोला तालुक्यातील अकोला वासूद येथील दीपक ऊर्फ गुंडा खटकाळे व सांगोला शहरातील तुषार सोपान इंगळे या दोघांना एक वर्षाकरिता सोलापूर जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले आहे . आतापर्यंत तालुक्यातून गुंड प्रवृत्तीच्या सहा जणांना तडिपार करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली


.कुमार आंनदा मेटकरी सचिन आनंदा केदार विजय प्रकाश घोडके राजु दिगंबर होवाळ दीपक ऊर्फ गुंडा खटकाळे तुषार सोपान इंगळे अशा लोकांना तडीपार  करण्यात आले आहे सांगोला तालुक्यात नूतन पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाळू माफिया , दंगा , मारामारी , जातिवाद करणे , महिलांची व मुलींची छेडछाड , विनयभंग , सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे विविध गुन्हे केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तडिपार करण्याचा सपाटाच सुरू केलेला आहे . आतापर्यंत तालुक्यातील सहा जणांना तडिपार करण्यात आले आहे . भगवान निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर व तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सावधानतेचाइशारा देऊन तसे फलकही विविध ठिकाणी लावले होते . या फलकाबाबत राज्यभर चर्चा झाली होती . तसेच नुसते फलक लावून कारवाईचा फार्स न करता व नवलाईचे नऊ दिवस असे न ठरता अशी कारवाई कायमस्वरूपी राहावी , अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली होती . पोलिस निरीक्षक निंबाळकरांकडून गुन्हेगारांना गुन्हे न करण्याबाबत वेळोवेळी समजही देण्यात आली असताना अनेक जणांच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने व त्यांच्या हातून अजून गुन्हे होण्याची भीती असल्याने अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तडिपार करण्यात येत असल्याची माहिती श्री . निंबाळकर यांनी दिली . शहर व तालुक्यात वाळू माफिया , जातिवाद करणारे ,  महिला व मुलींची छेडछाड करणारे , दादागिरी करणारे , चोऱ्या , दरोडा , मटका , अवैध दारू विक्री असे अवैध धंदे करणाऱ्यांनी हे गुन्हे बंद करून सुधारण्याचा प्रयत्न करावा ; अन्यथा अशा प्रकारचे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना मी कधीही सोडणार नाही - भगवान निंबाळकर , पोलिस निरीक्षक , सांगोला

Post a Comment

0 Comments