सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांनी काल गुरुवार दि .२५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानीभेट घेतली . याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ उपस्थित होते .
आबासाहेब तुम्ही कोणताही शब्द टाका , मी तुमचा शब्द पाळणार , तुमचा शब्द मी मोडणार नाही असे सांगत आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाई | गणपतराव देशमुख यांच्या तब्येतची विचारपूस केली . भाई गणपतराव देशमुख यांच्याशी तालुक्यातील विविध | विषयांवरती तब्बल अर्धा तास चर्चा केलीअसल्याचेही त्यांनी सांगितले . संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श बायबा असं जिव्हाळ्याचं राजकीय नातं आबासाहेश आणि शहाजीबापू यांनी आजपर्यंत जपले आहे . राजकारण हे नेहमी राजकारणाच्या जागी ठेवायचं असतं . एकमेकांमधला जिव्हाळा कधीच आटु द्यायचा नसतो , हाच संदेश या भेटीतून दोन्ही नेत्यांनी दिला असल्याचे चर्चा काल सांगोला तालुक्यांमधून ऐकावयास मिळत होती .
0 Comments