google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी सभ्यतेने वागावे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पो.नि.निंबाळकर यांना केल्या सुचना..

Breaking News

सांगोला पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी सभ्यतेने वागावे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पो.नि.निंबाळकर यांना केल्या सुचना..

 सांगोला पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी सभ्यतेने वागावे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पो.नि.निंबाळकर यांना केल्या सुचना..


सांगोला:-सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरीकांवर कडक निर्बंध लादले आहेत यामुळे गर्दी कमी करणे, मास्क कायमस्वरूपी वापरणे, लग्न संभारंभासाठी 50 पेक्षा जास्त लोक जमा न होणे अशा सूचना शासनाकडून केल्या आहेत याची काटेकोरपणे अंबलबजावणी करण्याचे काम नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासन करीत आहे. परंतु गेल्या दोन -तीन दिवसांपासून सांगोला शहारामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांकडून नागरीकांना मास्क घातला नसल्याचे पाहुन मारहाण करणे, शिवीगाळ करणे, कॉलर धरून जबरदस्तीने गाडीमध्ये बसविणे असे असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी व्यापारी प्रतिनिधी व नागरीकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना भेटून केल्या असता यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दूरध्वनीवरून पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी सभ्यतेने वागावे अशा सक्त सुचना देऊन भविष्यामध्ये नागरीकांच्या तक्रारी येऊ नयेत याची काळजी घ्यावी असे  सांगीतले.याबरोबर नागरीकांनीही प्रशासनाच्या सुचना काटेकोरपणे पाळाव्यात, मास्क नियमितरित्या वापरावा, अनावश्यक गर्दी टाळावी व कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments