सांगोला / प्रतिनिधी : डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव या दरम्यान शासनाने कोरोना संदर्भात काही लागू केलेले नियम शिथिल करण्यात यावेत , यासाठी आर.पी.आय.ए. यांच्या वतीने नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहेत .
१४ एप्रिल डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर साजरी होत असते . परंतु गेल्या वर्षी पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती जयंती साध्या घरगुती पद्धतीने साजरी करण्यात आली . डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माचे महापुरुष असून त्यांची जयंती सर्वच बौद्ध बांधव व भीमसैनिक मोठ्या थाटामाटात कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन कोणत्याही समाजाच्या भावना न दुखावता साजरी करतात . परंतु या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासन लादुन लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाकारता येत नाही . वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , मंगळवेढा मतदारसंघातील पोट निवडणुकीमुळे राजकीय पक्षांचे मेळावे होत आहेत . राजकीय बैठका होत आहेत . उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणताही नियम न पाळता नेतेमंडळी एकत्रित जमा होत आहेत . जर राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी जर ह्या असे गर्दीचे कार्यक्रम घेऊ शकतात . तर महापुरुषांच्या जयंतीस निबंध कशासाठी असा निवेदनाद्वारे सवाल : करीत , शासनाने आंबेडकरी जनतेच्या सामाजिक भावना लक्षात घेऊन सदर जयंतीच्या काळामध्ये शासनाने घातलेल्या काही नियमांमध्ये शिथिलता करावी . सदर विषयासंदर्भात बैठक घेऊन सदरच्या नियमावली बद्दलचा खुलासा ५ एप्रिल च्या आत करावा अशी विनंती आर.पी.आय.ए. यांच्या वतीने नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी केली आहे . सदर निवेदन दे ते वेळी आर.पी.आय. जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक सुरज दादा बनसोडे , आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष अरुण अण्णा बनसोडे , आरपीआय तालुकाध्यक्ष दीपक होवाळ , आरपीआय युवक तालुकाध्यक्ष विनोद उबाळे , कार्याध्यक्ष स्वप्नील सावंत , लकी कांबळे , आनंद बनसोडे , समाधान कोळी , नागेश लोखंडे , विनायक गंगणे , आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
0 Comments