पतीकडून अनैसर्गिक संबंधाची मागणी तर सासऱ्या कडून लैंगिक अत्याचार महिलेची पोलिसात धाव
धौलपूर – एकीकडे महिलांवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी कायदे कडक केले जात असल्याचे बोलले जात असले तरी महिलांवरील अत्याचार काही कमी होत नाहीत.त्यातल्या त्यात काही वेळा पोलीस देखील असहकार्याची भूमिका घेतात असाच प्रकार धौलपूर येथे घडला आहे. शेवटी न्यायासाठी तिला न्यायालयात धाव घ्यावी लागली.या २४ वर्षीय महिले चे म्हणणे आहे की तिच्या लग्नाला पाच महिने झाले असतांना नवरा अनैसर्गिक सबंध बनविण्यासाठी तिच्यावर दबाब टाकत होता. तर ती गर्भवती असतांना तिचा गर्भपात करण्यात आला.इतकेच नाही तर सासऱ्याने देखील जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आहे . ती तक्रार घेऊन पोलिसांकडे गेली होती ओण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिने कोर्टाचा दरवाजा ठोठावला.कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासऱ्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.तिने आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की लग्नाच्या १५दिवसानंतरच सासरच्या लोकांनी ५ लाख रुपये हुंडा आणण्याससाठी तगादा लावला होता. तिने ही बाब माहेरच्या लोकांना सांगितली होती. पण त्यानी पैसे देण्यास नकार दिल्याने सासारच्या लोकांकडून तिला तरस देण्यात येत होता.
0 Comments