google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हव्यासापोटी महिलेने केला खून, तांत्रिकाच्या नादी लागून 3 वर्षाच्या मुलाचा दिला बळी

Breaking News

हव्यासापोटी महिलेने केला खून, तांत्रिकाच्या नादी लागून 3 वर्षाच्या मुलाचा दिला बळी

 हव्यासापोटी महिलेने केला खून, तांत्रिकाच्या नादी लागून 3 वर्षाच्या मुलाचा दिला बळी नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मुल होण्याच्या हव्यासापोटी एका महिलेने शेजार्‍यांच्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा बळी देण्यासाठी गळा दाबून हत्या केली. महिलेने हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत बांधून तो शेजारच्या छतावर टाकला. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला.


हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीच्या बुद्धविहार परिसरातील आहे. पोलिसांनी तपासानंतर शेजारच्यांच्या छतावरून मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी महिलेला अटक केली आहे. मृत मुलाच्या कुटुंबियांनी घटनेनंतर आक्रोश केला. आजूबाजूचे लोक सुद्धा हादरून गेले आहेत.डीसीपी प्रणव तायल यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय महिलेचे नाव नीलम गुप्ता असून ती युपीच्या हरदोई परिसरातील सुंदाबल गावातील रहिवाशी आहे. ती आपला पती पंकज गुप्तासोबत रिठाला गावात राहात होती. लग्नाच्या आठ वर्षानंतर सुद्धा तिला मुल झाले नव्हते. यासाठी तिने हरदोईमध्ये एका तांत्रिकाची भेट घेऊन त्याला उपाय विचारले होते. यावर तांत्रिकाने तिला एका मुलाचा बळी देण्यास सांगितले होते. मुलाच्या हव्यासापोटी या महिलेने अंधश्रद्धेला बळी पडून हा धक्कादायक गुन्हा केला.माहितीनुसार शनिवारी सायंकाळी पोलिसांना रिठाला गावातील गल्ली नंबर-18 येथील रहिवाशाचा तीन वर्षाचा मुलगा पीयूष गुप्ता हरवल्याची माहिती मिळाली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मुलाचे वडील दयाराम गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा पीयूष छतावर होता. यानंतर कसा गायब झाला समजले नाही. तो खाली आलाच नाही. पोलिसांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरूवात केली.शोध सुरू असताना शेजारच्या घराच्या छतावर एक गोणी आढळली. ज्या प्रकारे भिंतीच्या आधाराने गोणी ठेवण्यात आली होती, ते पाहून पोलिसांना संशय आला, गोणी उघडली असता त्यामध्ये पीयूषचा मृतदेह सापडला. त्याच्या मानेवार निशाणी होते. मृतदेह मिळाल्यानंतर परिसरात तणाव पसरला. पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा शेवटचा शेजारच्या घरात पाचव्या मजल्यावर राहणार्‍या नीलम सोबत दिसला होता. यानंतर पोलिसांनी नीलमची चौकशी केली तेव्हा तिने काहीच माहित नसल्याचे सांगितले पण पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने हत्या केल्याचे कबुल केले.मुल होत नसल्याने सुमारे चार वर्षापूर्वी ती हरदोई येथे गेली होती. येथे ती एका तांत्रिकाला भेटली. त्या तांत्रिकाने महिलेला मुल होण्यासाठी एका मुलाचा बळी देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, यापूर्वी ती तयार नव्हती. तिला मुल दत्तक घ्यायचे होते. यासाठी सुद्धा तिने खुप प्रयत्न केले. परंतु जेव्हा मुल दत्तक घेणे शक्य झाले नाही तेव्हा तिने तांत्रिकांचा उपाय करण्याचा विचार केला. नेहमी येणे-जाणे असलेल्या घरातील पीयूषची तिने यासाठी निवड केली आणि पुढील भयंकर हत्याकांड घडले.

Post a Comment

0 Comments