सांगोला : महिलाही पुरुषांच्या बरोबरीने योगदान असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात दिसून आले आहे . सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीसाठी सातशे रणरागिणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या . या निवडणुकीत तब्बल ३७८ महिला सदस्या विजयी झाल्या आहेत . विशेष म्हणजे सरपंच निवडीच्या आरक्षणातून ३८ महिलांना ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काम करण्याची संधी मिळणार असून त्या गावचा कारभार पाहणार आहेत . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्यापासून त्यांचा राजकीय सहभाग वाढला असून अनेक महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत . मागील पाच दहा वर्षात अनेक महिलांनी ग्रामपंचायतचे सरपंच , जिल्हा परिषद अध्यक्ष , पंचायत समितीच्या सभापती , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य म्हणून सांभाळण्यास सक्षमपणे आम्ही नेतृत्व करू शकतो हे दाखवून दिले आहे . सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल ३७८ महिला सदस्या विजयी झाल्या आहेत . सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीना महिला सरपंच लाभणार असून गावगाड्याचा कारभार करण्याची संधी त्यांना मिळणार आहे
. यंदाच्या निवडणुकीत उच्चशिक्षित , शिक्षिका , व्यावसायिक , गृहिणी , शेतकरी महिला निवडणूक लढवत आहेत . वर्षानुवर्षे घराच्या आणि शेतीच्या कामात मग्न असणाऱ्या महिला मात्र आता मैत्रिणी ,जावा , ननंद , भावजय , यांच्या सोबतीने घरोघरी जाऊन ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार केला . घरोघरी जाऊन संपूर्ण कुटुंबाला मतदानासाठी आवाहन करीत किंबहुना स्वतः , पतीने , सासर्यांनी राजकारणात समाजकारणात केलेल्या कामाचा पाढा वाचून मी यापुढे कसे काम करणार हे पटवून दिले . ग्रामपंचायतीतील नारीशक्तीमुळे गावपातळीवरील अनेक समस्या सुटतील अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे .
0 Comments