कराड : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सधन कुटुंब , नोकरदार , पेन्शनधारक यांची विविध मार्गानी शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत . त्यानुसार कराड तालुक्यात ही शोधमोहीम सुरू झाली असल्याची माहिती
, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली . तहसीलदार वाकडे म्हणाले , शासनाच्या रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य डॉक्टर , स्थापत्य विशारद , लेखापरीक्षक आहेत , कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यासाय कर , विक्रीकर किंवा आयकर भरतात तसेच टॅक्सी , रिक्षा वगळून चारचाकी यांत्रिक वाहन आहे . ज्यांच्याकडे बंगला आहे . ज्यांचे निवृत्तीवेतनधारक अथवा नोकरदार व्यक्ती आहेत व ज्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रुपये ४४ हजारापेक्षा जास्त व शहरी भागात रुपये ५ ९ हजारापेक्षा जास्त आहे , अशा व्यक्तींनी आपल्या रास्तभाव दुकानदारांकडे ' अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा ' योजनेचे स्वयंघोषणापर ३१ जानेवारी २०२१ पर्यत भरुन द्यायचे आहे . कराड तालुक्यामध्ये सधन उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांची शोधमोहिम सुरु आहे . एक फेबुवारीपासून तपासणीमध्ये स्वेच्छेने स्वयंघोषनापत्र भरून न दिलेले तसेच वर नमुद कार्डधारक आढळून आल्यास त्यांच्यावर धान्याचा लाभ घेतल्यापसून चालु बाजारभावाप्रमाणे धान्याची वसुली लावून पौजदारी कारवाई केली जाणार आहे .
0 Comments