कूळ कायद्याची जमीन विकताना 50 टक्के मूल्यांकन न भरणार्यांविरोधात कार्यवाही
कुळकायदा वहिवाटीप्रमाणे ज्यां जमीन मालकांची कुळाला जमीन मिळाली आहे. त्या कुळाने कूळ कायद्याने मिळालेल्या जमिनीचा खरेदी व्यवहार केला. मात्र शासनाची परवानगी न घेता व चालू बाजार भावाने 50 टक्के मूल्यांकन न भरल्याने अशा कुळ जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम कराड महसूल विभागाच्यावतीने सुरू केली असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 84(क) एकूण 65 प्रकरणे कराड महसूल विभागात दाखल आहेत. सदर प्रकरणापैकी 6 प्रकरणांमध्ये चालू आर्थिक वर्षात 10 लाख 74 हजार 500 रुपये एवढी रक्कम महसूल विभागाने वसूल करून शासनाकडे जमा करण्यात आली आहे. एकूण 59 प्रकरणांमध्ये सदरची कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे. प्रथमदर्शनी कराड तालुक्यातील 59 जणांना कूळ कायद्याप्रमाणे जमीन प्राप्त झाली आहे. अशी माहिती उपलब्ध आहे. दरम्यान जमीन प्राप्त झाल्यानंतर 59 जणांनी सदरची जमीन इतरांना खरेदी दिली. मात्र शासनाची परवानगी घेतलेली नाही. खरेदी – विक्री करत असताना शासनाला बाजारभावाने 50 टक्के होणारी मूल्यांकनाची रक्कम भरावी लागते. ती रक्कम न भरता असे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. त्यांच्या विरोधात महसूल विभागाने जोरदारपणे मोहीम सुरू केली आहे.
4 प्रकरणांमध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम प्रमाणे शासन जमा करण्यात आले आहे. रघुनाथ आत्माराम जाधव, नांदगाव (या.कराड) यांच्याकडे असणारे वेगवेगळ्या चार गटाच्या जमिनीच्या चालू बाजार भावाने 50 टक्के होणारे मूल्यांकन महसूल विभागाने भरून घेतले आहे. एकूण 2 लाख हजार 140 रुपये शासकीय खजिन्यात जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत 12 लाख 81 हजार 640 रुपये वसूल करण्यात आले आहेत. कराड तालुक्यात कुळकायद्याप्रमाणे ज्यांना जमिनी प्राप्त झाल्या आहेत. अशा व्यक्तीनी महसूल विभागाची परवानगी न घेता परस्पर खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. त्यांचा तपास महसूल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
राज्य शासनाने महसूल विभागाचा कारभार करताना कायदा व नियमांचे उल्लंघन करून कूळ कायद्याच्या जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार झाले आहेत. हे खरेदीचे व्यवहार कायदेशीर दृष्ट्या गैर आहेत. त्यांच्याकडून चालू बाजारभावाने 50 टक्के होणारे मूल्यांकन वसूल करण्यात येत आहेत. – अमरदीप वाकडे, तहसीलदार,कराड.
0 Comments