आबासाहेब" "वीर" सामाजिक पुरस्कार तालुक्यातील जनतेचा आहे ~ भाई गणपतराव देशमुख किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने सांगोला येथे पुरस्कार सोहळा संपन्न.
कोळा / वार्ताहर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी स्वातंत्र्यसैनिक यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बरोबरीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला ते स्वातंत्र्यसेनानी "आबासाहेब"वीर" यांचे कर्तृत्व मोठे आहे स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनेक शैक्षणिक सहकारी सामाजिक संस्था स्थापन करून लोकपयोगी काम उभारले आहे क्रांतिवीर आबासाहेब वीर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आज मी स्वीकारत आहे मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत परंतु बाबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील आगळावेगळा पुरस्कार आहे हा मला मिळालेला पुरस्कार माझा नसून ज्या मतदारांनी मला मतदान करून माझ्यावर विश्वास टाकला त्यांनी मला आशीर्वाद दिले त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे असे मी मानतो व सांगोल तालुक्यातील जनतेचा पुरस्कार असल्याचे भाई गणपतराव देशमुख यांनी सांगितले. भुईंज ता वाई जि सातारा येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार भाई गणपतराव देशमुख व सौ रतनबाई देशमुख यांना चेअरमन मदन भाऊ भोसले व संचालक मंडळाच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कारांमध्ये सन्मानचिन्ह एक लाख रुपये मानपत्र असे स्वरूप आहे पुरस्कार सोहळा सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे संपन्न झाला.
किसन वीर सहकारी कारखान्याचे चेअरमन मदन भोसले बोलताना म्हणाले की गेल्या २४ वर्षांपासून हा सामाजिक पुरस्कार दिला जात आहे या पुरस्कारासाठी अभ्यास समिती नेमून निवड केली जाते भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या जीवनामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार सर्वसामान्य जनतेसाठी काम उभे केले त्यांच्या या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे. संसदीय कार्य प्रणाली मध्ये भाई गणपतराव देशमुख यांनी राजकारणामध्ये नव्याने उदयास येणाऱ्या तरुणांना आदर्श आहेत महाराष्ट्रात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याचा कायम दुष्काळी तालुक्याचा ठसा आपल्या कामाने पुसून टाकला आहे
जीवन मूल्य पासून गणपतराव देशमुख कधीही ही ढळले नाहीत किसनवीर सहकारी कारखान्याच्या वतीने त्यांना पुरस्कार प्रदान करताना आनंद वाटत आहे असे सांगितले. या कार्यक्रमास चेअरमन मदन भोसले सर्वश्री संचालक चंद्रकांत इंगवले सचिन साळुंखे नंदकुमार निकम मधुकर शिंदे चंद्रसेन शिंदे विजय चव्हाण नवनाथ केंजळे प्रकाश पवार निवड समिती सदस्य अनिल जोशी अनिल जोशी रमेश डुबल प्रताप पिसाळ देशमुख ए ए काळुंखे, सचिन वाघमळे राहुल तांबोळी महानंदा दूध संघाचे संचालक चंद्रकांत दादा देशमुख, चिटणीस विठ्ठलराव शिंदे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संगीताताई धांडोरे सांगोला पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले, उपसभापती तानाजी चंदनशिवे, बाबा कारंडे, बाळासाहेब काटकर सचिन देशमुख, दादा शेठ बाबर सुरेश माळी मारुती आबा बनकर,बाळासाहेब एरंडे मार्केट कमिटीचे चेअरमन गिरीश गंगथडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पीडी जाधव, सूतगिरणीची कार्यकारी संचालक संजय कुमार अनुसे कामगार अधिकारी वाघमोडे भाई जगदीश कुलकर्णी, मायाक्का ताई यमगर नगरसेविका स्वाती मगर, मायाप्पा यमगर, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. किसनवीर कारखाना वरून अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन नानासाहेब लिगाडे यांनी केले कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments