google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे खा.पवारांनी दिले आश्वासन

Breaking News

सांगोला तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे खा.पवारांनी दिले आश्वासन

 सांगोला ( सोलापूर ) : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरद पवार गुरुवार ( ता . 12 ) नोव्हेंबर रोजी आटपाडी तालुक्यातील खानजोनवाडी येथील डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांची सांगोल्यातील राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड , तानाजी पाटील , विजयदादा येलपले यांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली . यावेळी तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना व शेतीच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर खा . शरद पवार यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा केली . याबाबत तात्काळ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक लावून सांगोला तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुखे - पाटील यांनी दिली .



यावेळी सोबत तासगावच्या आमदार सुमनताई पाटील व पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .दर्जेदार डाळिंब उत्पन्नासाठी देशात प्रसिद्ध असणाऱ्या सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना रखडलेल्या सिंचन योजनांमुळे पाणीटंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागते . ही बाब लक्षात घेऊन दिपक साळुखे पाटील यांनी म्हैसाळ योजनेतुन तालुक्यातील पारे तलाव , हंगिरगे तलाव , जवळा तलाव भरून द्यावा . तसेच गळवेवाडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून कोरडा व माण नदीवरील सर्व को.प.बंधारे , लहान - मोठे पाझर तलाव त्वरीत भरुण देण्यात यावेत . म्हैसाळ योजनेत वाकी घे . , वाणीचिंचाळे , आलेगांव खालील बाबरवाडी , मेडशिंगी , बुरलेवाडी आणि राजापुर या गावांचा समावेश करण्यात यावा .पाचेगांव खु . , सोमेवाडी , चोपडी , उदनवाडी , बलवडी , नाझरे या गांवाना त्याचा मोठा फायदा हाईल . टेंभू योजनेतुन कि.मी .47.900 वरील फाट्यातून वाटंबरे पाझर तलाव क्रमांक 3 मध्ये 18 इंची बंद पाईपलाईन करुन पाणी देण्यात यावे . कवठेमहाकाळ कॅनाल वरील पाचेगांव बु . ते कोळा ते गौडवाडी ते बुध्देहाळ तलावास मिळणारा नाला यालाकॅनालचा दर्जा द्यावा , किडबिसरी ते कोंबडवाडी कोळा नाला याला कॅनालचा दर्जा द्यावा , सांगोला कॅनाल वरील कोळा नाला ते बुध्देहाळ तलावास कॅनालचा दर्जा मिळावा , जुनोनी तलाव तिप्पेहळळी ते जुनोनी तलाव ते हातीद बेलवण नदी जुजारपूर ते हातीद बेलवण नदीला कॅनालचा दर्जा देण्यात यावा . नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत कि.मी. 0 ते मैल 93 पर्यंत कॅनालमधुन बंद पाईपलाइनद्वारे सांगोला व पंढरपूर तालुक्याला पाणी देण्यात यावे . त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे . चिंचोली तलाव हा निरा उजवा कालव्याला टेल टॅक म्हणुन जाहीर करुन तो नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने भरुन देण्यात यावा . उजनी धरणामध्ये सांगोलापाण्याने भरुन देण्यात यावा . उजनी धरणामध्ये सांगोला तालुक्याच्या वाट्याचे 2 टीएमसी पाणी आरक्षित आहे . सदरचे पाणी इस्त्रायल देशाच्या धरतीवर बंद पाईपलाईनमधुन दसुर ( टॅक ) बंधाऱ्याजवळ आणून तेथुन तालुक्यामध्ये हे पाणी येणे शक्य आहे . यामुळे तालुक्यातील पाण्यापासुन वंचीत असलेल्या गांवाचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे . इटकी , कटफळ , अचकदाणी , लक्ष्मीनगर , चिकमहुद , बंडगरवाडी , नरळेवाडी ( वाकी ) , या गावांअर्तगत येणाऱ्या वाड्या - वस्त्या मिळुन या गांवातील शेतकरी पाण्यापासुन वंचित आहेत . या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राजेवाडी तलावाचा उरमोडी आणि जिहे कठापूर सिंचन प्रकल्पामध्ये समावेश करावा आणि वंचीत गांवासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करावे . तालुक्यातील नद्यांना कॅनॉलचा दर्जा देऊन विविध सिंचन योजनांतून या नद्यांना वर्षातून किमान आठ महिने पाणी सोडावे अशा शेती आणि पाण्यासंदर्भात विविध मागण्या माजी आमदार दिपक साळुखे पाटील व शिष्टमंडळाने माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे केल्या .

Post a Comment

0 Comments