प्रति , मा . खा . शरदचंद्रजी पवार साहेब माजी कृषी मंत्री व संरक्षण मंत्री भारत सरकार . विद्यमान मुख्य संचालक शिवसेना , काँगेस , राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार ( महाराष्ट्र राज्य ) विषय : राज्यातील उपेक्षित , दुर्लक्षित कोतवालांच्या प्रलंबित मागण्याची गांभिर्याने दखल घेवून महाराष्ट्र राज्य सरकारला कोतवालांना न्याय देण्याबाबत योग्य मार्गदर्शन आणि कोतवालांची अधिक उपेक्षा न करण्याच्या सुचना करण्याबाबत न. निवेदन . मा . महोदय , संघटनेद्वारा नम्रतापूर्वक निवेदन सादर करण्यात येते की , भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि १ ९ ६० साली महाराष्ट्र राज्य व गुजरात राज्याची निर्मिती झाल्यानंतर जे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात होऊन गेले त्यांनी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचे नेतृत्व करुन देशाची , राज्याची प्रगती केली त्यामध्ये आपलाही सिंहाचा वाटा आहे . इंग्रजांच्या काळापासून देशाच्या वेगवेगळ्या राज्यात कोतवाल कार्यरत आहेत
. महाराष्ट्र राज्याबरोबर १ मे १ ९ ६० ज्या गुजरात राज्याची निर्मिती झाली . त्या गुजरात राज्याने १ ९ ७ ९ साली सर्व संमतीने व ठराव पारीत करुन ज्या राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला आहे . चतुर्थ श्रेणी मिळाल्यामुळे त्या राज्यातील कोलवाल बांधवांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सोई सुविधांचा लाभ मिळत आहे . चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेवेतन , भत्ते , ग्रज्युएटी , पेन्शन , प्रमोशन वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी असे सर्व फायदे मिळत आहेत . महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळेस म्हणजे १ ९ ६० साली महाराष्ट्र राज्यात ५०० लोकसंख्येसाठी एक कोतवाल याप्रमाणे ७० ते ७२ हजार कोतवाल कार्यरत होते . महाराष्ट्र राज्याची वाढलेली लोकसंख्या जिल्हे , तालुके विविध योजना आणि कार्यक्रम यांचा विचार केल्यास कोतवालांची संख्या दीड ते दोन लाख असायला हवी होती . १ ९ ६० साली ७० ते ७२ हजार कोतवालांचा पगार महाराष्ट्राच्या तिजोरीतून देण्यात येत होता . पुर्वीप्रमाणे कोतवाल पदाच्या भर्तीचा नियम राहिला असता तर आज दोन लाख कोतवालांना पगार द्यावा लागला असता . १ ९ ८४ सालापासून महाराष्ट्र राज्य सरकारने कोतवाल कपात करुन गुजरात प्रमाणे राज्यात कोतवाल पदाच्या भर्तीचा नियम लागू करुन गुजरात प्रमाणे एका तलाठी साज्यासाठी एकच कोतवाल याप्रमाणे भर्ती करुन महाराष्ट्र राज्यात असलेल्या १२६३७ तलाठी इतकी कोतवालाची संख्या मर्यादित केली . परंतु गुजरात राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील कोतवालांना विधीमंडळाने सर्व संमतीने ठराव पारीत करुन चतुर्थ श्रेणीचा दर्जा बहाल करण्याचे सौजन्य व औदार्य दाखविण्याचे पुण्यकर्म न करता पुर्वीपासून शासन व प्रशासनातील मान्यवरांच्या संयुक्त संगनमताने सुरु असलेल्या शोषणाची परंपरा कायम ठेवून राज्यातील सर्व कोतवालांना शिक्षण , आरोग्य , निवारा या सुखापासून वंचित तर ठेवलेच , त्यांच्या माथ्यावर अवर्गीकृत कर्मचाऱ्यांचा शिक्का मारुन कायम स्वरुपाचा अपंगत्व लादून पेन्शन , ग्रज्युएटी , प्रमोशन , अनुकंपा तत्वावर नोकरी केंद्र व राज्याप्रमाणे वेतन आयोगाच्या शिफारसीने मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवून इन्स्टॉलमेंट ने मारण्याचे महाभयंकर पाप केले आहे . या पापात राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचा सहभाग आहे . ते सत्ताधारी असो की , विरोधी पक्ष असो .महाराष्ट्र शासनाने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी एक दिवसांचे तातडीचे अधिवेशन बोलावून कोतवालांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढल्याच पाहिजे अशी सुचना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , अर्थमंत्री , महसुल मंत्री , कामगार मंत्री , समाजकल्याण मंत्री , राज्याचे मुख्यमंत्री , महसुल , अर्थ , सामान्य प्रशासन व समाजकल्याण आणि कामगार खात्याचे प्रधान सचिव व मंत्री , राज्यमंत्र्याची बैठक बोलावून निर्णय घेण्यास भाग पाडावे . आपले सहकारी आघाडीचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी , माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , माजी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री मा . जयंतराव पाटील ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष ) , मा . एकनाथराव खडसे , माजी महसुल मंत्री मा . छगनजी भुजबळ साहेब या सर्वांचे सहकार्य नक्कीच मिळेल व आपल्या पुढाकाराने कोतवालांचे जयमंगल व कल्याण होईल याच रास्त आशेने वकाही नेत्यांनी कोतवालांना न्याय देण्याचे प्रयत्न केले आहेत ते न्याहारी ( नाश्ता ) अथवा फराळ देण्यासारखे आहे . कोतवालांना सन्मानाने जगविले पाहिजे तेही इतर मानसासारखी मानवाचीच उत्पत्ती आहेत , ज्यांच्याकडे अधिकार व सत्ता आहे . त्यांनी त्या अधिकाराचा सदूपयोग करुन उपेक्षितांना न्याय देण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे . असेच तत्वज्ञान आमच्या पुर्वजांनी दिले आहे . ज्यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवुन राज्य कारोभार करण्याचा दावा करतो ते आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज , महात्मा ज्योतीबा फुले , महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर , पंडीत जवाहर नेहरु , महामानव भगवान गौतम संत कबीर , संत तुकाराम महाराज , संत गाडगे महाराज किंवा ज्यांची पुजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक जाऊन करतात ते पंढरपुरचे विठुराया , ज्यांच्या कुणांच्या विचारांचे वारसदार आम्ही असु त्यांनी अशा पध्दतीने निष्पाप कोतवालांचे पुरोगामी महाराष्ट्रात होत असलेले शोषण पाहून आनंद होत असेल काय ? साहेब , आपणाला जाणता राजा म्हणून ओळखले जाते . संपूर्ण भारत देशातील प्रत्येक विकासाची प्रत्येक जाती - धर्माच्या , समाजाच्या सर्व समस्यांची जाणीव आपणास आहे . त्या शिवाय भारत देशावर आणि विशेषत : महाराष्ट्र राज्यावर आलेल्या सर्व संकटांचा आणि नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला आपण केला आहे , तो कसा करावा याचे शिकवण आपण महाराष्ट्रातील वडीलधारे म्हणून दिली आहे . राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देणे हे महाराष्ट्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे . कोतवाल सेवानिवृत्त झाले किंवा त्यांच्या विधवा अर्धांगीनीस दारोदार भीक मागुन अथवा अन्नावाचून अथवा औषधोपचारा अभावी रोज इन्स्टॉलमेंट ने मरण येत आहेत .६ ) मा . ना . धनंजयजी मुंडे साहेब , सामाजिक न्याय व समाज कल्याण मंत्री . महाराष्ट्र राज्य , ७ ) मा . अशोकराव चव्हाण , माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश अध्यक्ष , काँग्रेस . मु.पो. नांदेड ८ ) मा . पृथ्वीराज चव्हाण , माजी मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मु.पो. कराड , जि . सातारा . ९ ) मा . सुशिलकुमार शिंदे , माजी मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य , मु.पो. सोलापूर . १० ) मा . छगनजी भुजबळ साहेब , अन्नधान्य पुरवठा मंत्री , महाराष्ट्र राज्य . ११ ) मा . नितीनजी राऊत , ऊर्जा मंत्री , महाराष्ट्र राज्य , १२ ) मा एकनाथजी खडसे , माजी महसुलमंत्री , महाराष्ट्र राज्य . १३ ) मा . मनोहरजी जोशी , माजी मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य , १४ ) मा . ना . बच्चुभाऊ कडू , राज्यकामगार मंत्री , महाराष्ट्र राज्य . १५ ) मा . ना . यशोमतीताई ठाकूर , महिला व बाल विकास कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य , तथा पालकमंत्री अमरावती . १६ ) मा . आमदार सुलभाताई खोडके , अमरावती विधानसभा मतदार संघ , गाडगेनगर परिषद , अमरावती . १७ ) मा . मुख्य सचिव , महा . राज्य मंत्रालय मुंबई -३२ . १८ ) मा . अप्पर मुख्य सचिव , अर्थ व नियोजन , महा . राज्य मुंबई -३२ . १ ९ ) मा . अप्पर मुख्य सचिव , महसुल , महा . राज्य मुंबई -३२ . २० ) मा . अपर मुख्य सचिव , सामान्य प्रशासन विभाग . २१ ) मा . प्रेस मिडीया प्रसिध्दीसाठीमहाराष्ट्र राज्य कोतवाल , संयुक्त संघर्ष समिती मा . उत्तमरावजी गवई , अध्यक्ष पत्र व्यवहाराचा पत्ता : मुख्य कार्यालय , मनपा दवाखान्यासमोर , विलासनगर , अमरावती - ४४४ ६०२ मोबा . ९ ४२३६२१५१४ , फॅक्स - ०७२१-२६६०२१३ उपाध्यक्ष मा.नामदेव शिंदे ( पुणे ) १ ९ २३७६१ ९९ २ सरचिटणीस मा . नामदेव पि . दंडाळे ( अमरावती ) ९ ७३०६७७८८१ सरचिटणीस मा . सुनिल एम.सोनावणे ( रायगड ) १२७३६१८००३ सरचिटणीस मा.योगेश वसल बाबर ( सातारा ) ९ ८५० ९ १५७५० सरचिटणीस मा.श्रीपती तोरस्कर ( कोल्हापूर ) ८२७५२६८०१६
0 Comments