सांगोला ( सोलापूर ) : सांगोला तालुक्यात जनावरांना लम्पी स्किन या रोगाचा प्रभाव वाढला आहे . तालुक्यातील डिकसळ येथे गुरुवारी ( ता . 19 ) प्रकाश भुसनर यांची सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची जर्सी गाय याच आजाराने मरण पावली . या आजारासाठी 40 हजारांचा खर्च करूनही भुसनर यांची गाय लम्पी आजारापासून वाचवता आली नसल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
या रोगामुळे एकीकडे पशुपालक आर्थिक अडचणीत आने पशुवैद्यकीय विभाग मात्र सुस्तच असल्याचे चित्र तात् A दिसून येत आहे .लम्पीच्या वाढत्या प्रभावामुळे पशुपालक त्रस्त , पशुवैद्यकीय विभाग मात्र सुस्त ! डिकसळ येथे गायीचा मृत्यू दत्तात्रय खंडागळे | 02.17 PM सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे गुरुवारी ( ता . 19 ) प्रकाश भुसनर यांची सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची जर्सी गाय लम्पी आजाराने मरण पावली . या आजारासाठी 40 हजारांचा खर्च करूनही भुसनर यांची गाय लम्पी आजारापासून वाचवता आली नसल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .तालुक्यातील डिकसळ गावच्या जनावरांना मागील सव्वा महिन्यापासून लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराने हैराण करून सोडले आहे . लम्पी आजार झालेल्या जनावरांच्या अंगावर जागोजागी फोड उठणे , जनावरांच्या चारा खाण्यावर परिणाम होणे व अशक्तपणा वाढणे ही लक्षणे जनावरांमध्ये दिसत आहेत . प्रकाश भुसनर यांच्या जनावरांना मागील सव्वा महिन्यापासून लम्पी स्किन या आजाराची लागण झाली होती . त्या वेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ . नवनाथ नरळे यांनी डिकसळ गावाला भेट देऊन सर्व जनावरांना मोफत उपचार देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या . तरी देखील सांगोला तालुका पशुवैद्यकीय विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही , अशी चर्चा पशुपालकांमध्ये आहे . भुसनर यांनी या गायीला औषधोपचार करण्यासाठी 40 हजार रुपये खर्च केला . तरी देखील तब्बल सव्वा महिन्याच्या उपचारानंतर अखेर गुरुवारी ( ता . 19 ) मृत्यूशी झुंज देत जर्सी गाय मरण पावली . त्यामुळे भुसनर यांच्यावर आर्थिक संकट आले असून , त्यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे . तालुक्यात बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात . परंतु सध्या लम्पीच्या वाढत्या - प्रभावामुळे शेतकरी हैराण झाला आहे .
आजारावरपशुवैद्यकीय विभाग वेळेत उपचार करीत नसल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे . एक लाख 40 हजारांचे नुकसान माझ्याकडे लहान - मोठी अशी एकूण 10 जनावरे आहेत . मागील काही दिवसांपासून लम्पी स्किन या आजाराने माझ्या सात जनावरांना ग्रासले आहे . या आजारावर उपचार करण्यासाठी पारे केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मागील महिनाभरात कोणतेच उपचार झाले नाहीत . मुळे असलेल्या एक लाख रुपये किमतीची जर्सी गाय व 40 हजार रुपये उपचाराचे असे एकूण एक लाख 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे - प्रकाश भुसनर , पशुपालक , डिकसळ पशुपालक आर्थिक संकटात तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी आजाराने पशुपालक त्रस्त झाले आहेत . कोरोनाच्या महामारीमुळे संकटात सापडलेला शेतकरी सध्या जनावरांवर लम्पी आजारामुळे आर्थिक अडचणीत सापडला असून पशुवैद्यकीय विभाग मात्र सुस्त असल्याचे जाणवत आहे .
0 Comments