google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 

पंढरपुरात पुरजन्य परिस्थिती : नागरिकांचे जनजीवन विस्कळीत ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

पंढरपुरात चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा मोठा विसर्ग पाहता शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासना कडून व्यक्त केली आहे . पंढरपूर शहराला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला आहे . कुंभार घाट येथील भिंत कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला होता . या सततच्या पावसाने व उजनी धरणातून सोडलेल्या विसंर्गाने पंढरपुरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे . सातारा , पुणे सोलापूर , मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक पुर्णपणे बंद केली आहे. सतत पडणाऱ्या पावासामुळे नदी, ओढे , नाले भरून वाहू लागले आहेत. आणि उजनी, वीर धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला आहे . २ दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या अनेक नद्यांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी आले आहे. त्यामुळे पंढरपुरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे .


Post a Comment

0 Comments