सांगोलची कन्या कु.अनन्या शेंडे "मिस टिन इंडिया सोफेस्टिकेटेड २०२५"राष्ट्रीय पातळीवरील
सौंदर्य स्पर्धेत टॉप टेन मध्ये येऊन "प्रतिभावान-सुसंस्कृत स्पर्धक"हा किताब मिळवून उल्लेखनीय कामगिरी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या भारतातील सर्वात नामांकित किशोरवयीन मुलांच्या २७ व्या अलीज क्लब मिस आणि मिस्टर टीन इंडिया २०२५ किशोरवयीन
मुलांची ब्युटी विथ ब्रेन स्पर्धेमध्ये सांगोल्यातील न्यू इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु. अनन्या अमर शेंडे हीची अंतिम फेरीमध्ये टॉप टेन मध्ये निवड होऊन
"मिस टीन इंडिया सोफेस्टिकेटेड २०२५" हा किताब मिळवून सौंदर्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सौंदर्य क्षेत्रातील नामवंत अलीज क्लब दिल्ली द्वारे २७ व्या मिस व मिस्टर टिन इंडिया अंतिम फेरीमध्ये
प्रतिभावान, सुसंस्कृत ,विवेकी स्पर्धक म्हणून गौरवास्पद कामगिरी करून हा किताब मिळवला आहे. न्यू इंग्लिश स्कुल सांगोला चे प्रतिनिधित्व करीत कु.अनन्या हिने तिच्या दृढनिश्चय,
आत्मविश्वास आणि मोहक व्यक्तिमत्त्वाद्वारे सौंदर्य क्षेत्रामध्ये यशस्वी पाऊल टाकले आहे.सांगोल्यातील सर्जन डॉ.अमर शेंडे आणि सौ.अंजली शेंडे यांची कु.अनन्या ही कन्या असून आपल्या सौंदर्य,कलागुण
आणि बौद्धिक क्षमतेच्या जोरावर या स्पर्धेच्या माध्यमातून उज्वल यश संपादन केले आहे. कु.अनन्या यांनी मॉडेलिंग,अभिनय आणि फॅशन डिझाईनिंग या क्षेत्रामध्ये सांगोला सारख्या ग्रामीण भागातून असूनसुध्दा आपल्या जिद्द,
चिकाटी व हिंमतीच्या जोरावर देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे आणि कौतुकाचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



0 Comments