ये पप्पा, ये पप्पा म्हणाली...; पोटच्या लेकीचा मृत्यू, आई बापाचा काळीज चिरणारा आक्रोश, अख्खं सोलापूर हळहळलं
सोलापूर : सोलापूरातील नामांकित सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे सोलापूरसह अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
त्याचदरम्यान, शहरात अजून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे.विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधील एका चिमुकलीला बाहेरील अनोळखी माणसाने दगड मारल्याने त्यात या चिमुरडीचा मृत्यू झालाय.
विजयपूर ते रायचूर पॅसेंजरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पॅसेंजर रेल्वे गाडीत बसलेल्या चिमुकलीला दगड लागल्याने तिचा मृत्यू झाला.
टिकेकरवाडीच्या अलीकडे काही किलोमीटरवर ही गंभीर आणि हृदयद्रावक घटना घडली आहे.
आरोही अजित कांगले असं पाच वर्षीय मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. चिमुकलीला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
आपल्या पोटच्या लेकीचा मृतदेह जेव्हा बाहेर आणला तेव्हा आई, वडील, बहीण, आजोबा आणि कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला. आरोहीचे वडील रडत रडत बोलत होते की, ती मला 'ये पप्पा...ये पप्पा म्हणाली...
माझा जीव गेला असता चाललं असतं पण...' हा आक्रोश पाहून रुग्णालयातील उपस्थितांच्या आणि डॉक्टरांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले.
नेमकी काय घडना घडली?
आरोहीच्या काकांनी म्हणजेच, अजित कांगले यांच्या लहान भावाने घटनेबाबत माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व कुटुंब तथा सर्वजण परंपरेनुसार
आम्ही एप्रिल महिन्यात लच्चन यात्रा महोत्सव असतो. त्या यात्रेदरम्यान आम्ही दोन दिवसाआधी जात असतो, आणि तिथे गेल्यावर एक दिवस मुक्काम करतो.
आम्ही सोलापूरला परतत असताना टिकेकरवाडी स्टेशनच्या अगोदर तीन ते चार किलोमीटर पाठीमागे डावीकडून भरधाव वेगाने एक दगड आला, आणि तो दगड माझ्या भावाच्या मुलीच्या डोक्याला लागला.
दगड लागल्यानंतर रक्त प्रचंड प्रमाणात वाहत होतं. माझ्या मोठ्या भावाने डोक्याला हात लावला आणि रेल्वेतून उतरुन रघुजी रुग्णालयात आणलं आणि तिथे तिला मृत घोषित केलं.
0 Comments