धक्कादायक..जुनाट व भंगार झालेल्या मंगळवेढा-कुर्ला बसने अचानक घेतला पेट; प्रवाशांनी काचा फोडून बाहेर मारल्या उड्या, जीवितहानी नाही
मंगळवेढा आगारातील मंगळवेढा पुणे कुर्ला या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या जुनाट व भंगार झालेल्या एम.एच. ४०/वाय. ५९६६ एस.टी. बसने फलटण नजीक चालू स्थितीत रस्त्यावर अचानक पुढील बाजूने पेट घेतला.
यामुळे गाडीत मोठ्या प्रमाणात धुर पसरला. त्यामुळे प्रवाशी वर्गात एकच धांदल उडाली. दरम्यान, दरवाज्याजवळ चूर झाल्याने प्रवाशी जमेल
त्या पद्धतीने काचा फोडून बाहेर पडले. गाडी प्रवाशांनी फुल्ल भरली होती. प्रवाशांनी एकमेकांना बाहेर येण्यास मदत
केल्याने पुढील अनर्थ टळला. ८ मार्च रोजी एम. एच. ४०/वाय ५९६६ ही एस.टी. बस सकाळी ८ वाजता मंगळवेढा येथून पुणे कुर्ला या मार्गावर निघाली होती.
दुपारी १२ वा दरम्यान फलटण पासून ७-८ कि.मी. अलीकडे बस चालू असताना अचानक पुढील बाजूने पेट घेतला व धुराचा लोट गाडीत आला.
अचानक झालेल्या या गोष्टीमुळे प्रवाशी घाबरून गेले. खाली उतरण्यासाठी धडपड करू लागले. परंतु दरवाज्याकडून धूर येत असल्याने त्यांना उतरण अडचणीचे झाले.
त्यामुळे प्रवाशांनी गाडीचे काचा फोडून बाहेर पडले व आपला जीव वाचवला. या गाडीत सुमारे ५० प्रवाशी असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
खराब गाड्या तातडीने निकाली काढाव्यात
माझ्या कामानिमित्त मंगळवेढा कुर्ला गाडीने पुण्याकडे चाललो होतो. दरम्यान, फलटण जवळ एस. टी. बसने पुढील बाजूने अचानकपणे पेट घेतला व धुराचा लोट मोठ्या प्रमाणात गाडीत आल्याने प्रवाशांची एकच धांदल उडाली.
जीव वाचवण्याचे हेतूने आम्ही सर्व प्रवाशानी काचा फोडून बाहेर पडलो. आणखी काही वेळ झाला असता तर गाडीतील सर्व प्रवाशांच्या जीवाचे बरे वाईट झाले असते.
एस.टी. महामंडळाच्या चुकीमुळे ही घटना घडली असून भंगार व खराब गाड्या तातडीने निकाली काढाव्यात. कमलेश माळी, प्रवाशी मंगळवेढा
इंजिन गरम झाल्याने वायरिंगने घेतला पेट
मंगळवेढा – कुर्ला गाडीने फलटण जवळ इंजिन गरम झाल्याने वायरिंगने पेट घेतल्याने ही घटना घडल्याची माहिती असून याबाबतचा अधिक अहवाल आल्यानंतर माहिती दिली जाईल. संजय भोसले, आगार व्यवस्थापक, मंगळवेढा,
0 Comments