खळबळजनक...सांगोला तालुक्यातील महूद येथील जमिन विक्रीच्या उद्देशाने बनावट सह्या करून तयार केले दस्त; चौघांना अटक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महूद येथील जमिन विक्रीच्या उद्देशाने बनावट सह्याच्या आधारे तयार केलेल्या कुलमुखत्यार पत्रावर खोट्या सह्यांच्या आधारे खोटे दस्त तयार केला.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वडिलोपार्जित जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने मूळ मालकाची फसवणूक केली. महूद येथील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील चार संशयित आरोपींच्या विरोधात सांगोला पोलिसात तक्रार दाखल झाली असून या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मदन रामचंद्र बाजारे (रा. उंब्रज ता. कराड जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अंकुश रामचंद्र सूर्यवंशी (प्रताप वाघमोडे, रा. भांबुर्डी ता. माळशिरस), रामचंद्र भगवान जाधव व राजानंद लालचंद बनसोडे (रा. सांगोला), देवाप्पा मेवा व्होवाळ (रा. वाकी- शिवणे ता. सांगोला) यांच्यासह इतर इसमांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान तपास अधिकारी यांनी आरोपींना अटक करून सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ६ दिवस पोलीस कोठडी दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
0 Comments