मोठी बातमी..तिप्पेहळी ग्रामपंचायतवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचा झेंडा
तिप्पेहळीच्या सरपंचपदी सौ अनिता माने यांची बिनविरोध निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ; तालुका प्रतिनिधी तिप्पेहळी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या सौ अनिता हनुमंत माने यांची बिनविरोध निवड झाली. सरपंचपदी निवड होताच
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी गावात गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
गतवेळी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांनी एकत्रित स्थानिक गटाने एकत्रित निवडणूक लढवली होती.
स्थानिक वाटाघाटीनुसार सरपंचपद दिपकआबा साळुंखे पाटील गटाला देण्याची वेळ आल्यानंतर माजी सरपंच तानाजी नरळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने
सर्व सदस्यांनी तानाजी नरळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदाची काल गुरुवार दि 20 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय तिप्पेहळी येथे निवड पार पडली.
या निवडीत रिक्त असणाऱ्या सरपंच पदासाठी एकमेव अनिता हनुमंत माने यांचा अर्ज आल्याने सौ अनिता हनुमंत माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
चौकट ;
नूतन सरपंच सौ अनिता हनुमंत माने यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा कारभार करावा. गावातील रखडलेल्या विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडून जे सहकार्य अपेक्षित आहे
ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सरपंचपदाबाबत दिलेला शब्द पूर्ण करण्यात अशोक नरळे यांनी विशेष प्रयत्न केले.
सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गावातील खोळंबलेली विकासकामे मार्गी लावून गावाला एक आदर्श गाव अशी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन
मा. दिपकआबा साळुंखे पाटील,माजी आमदार
0 Comments