शहीद अशोक कामटे, गाडगे महाराज जयंती साजरी राष्ट्रसंत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले संत होते:- बबनराव चंदनशिवे
सांगोला (प्रतिनिधी.शब्दरेखा एक्सप्रेस न्युज ९५०३४८७८१२)
सार्वजनिक स्वच्छता ,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. संत गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले संत होते .
समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती ,अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी गाडगे महाराजांनी आपले आयुष्य वेचले असे प्रतिपादन सांगोला तालुका राष्ट्रीय मानवअधिकार संघटनेचे अध्यक्ष बबनराव चंदनशिवे यांनी केले.
ते शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांची 149 वी व अशोक कामटे यांची 60 वी जयंतीनिमित्त त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील संघटनेच्या तोरणा कार्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज व शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश पाटोळे, विलास नवले
यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संघटनेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी तालुकाध्यक्ष गणेश पाटोळे , विठ्ठलपंत शिंदे सर ,बाळकृष्ण टापरे ,दीपक पाटोळे ,उत्तम पाटोळे , जगन्नाथ काटे,अशोक पाटोळे ,मेजर रसाळे , विलास सोनटक्के ,अमोल शिंगारे ,सुयोग बनसोडे, दादा जाधव,
सागर ननवरे दगडू पाटोळे, काशिनाथ साळुंखे, अभिजीत चव्हाण ,भालचंद्र भंडारे यांचेसह डेबूजी चौकातील पदाधिकारी , सदस्य उपस्थित नागरिकांनी महापुरुषांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलकंठ शिंदे सर , आभार चारुदत्त खडतरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक कामटे संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments