विद्यार्थी शिवसेना व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष आयोजित आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पूर्ण..!
मा.आमदार अँड.शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी शिवसेना व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सांगोला यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपादन .
सदर आरोग्य शिबिर डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे मॅडम खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोला तालुक्याचे मा.आमदार अँड.शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदर आरोग्य शिबिरामध्ये स्त्रीरोग विभाग , सर्जरी विभाग , मेडिसिन विभाग , अस्थिरोग विभाग , बालरोग विभाग , या विभागातील रुग्णांची मोफत तपासणी मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रिया ह्या सेवा देण्यात आल्या .
सदर मोफत आरोग्य शिबिरामध्ये एकूण 187 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले . यामध्ये वयोवृद्ध ,महिला , पुरुष , तरुण , यांचा सहभाग होता .
या आरोग्य शिबिराच्या दरम्यान श्री.मंगेश चिवटे-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी व्हिडिओ कॉल द्वारे रुग्णांशी संवाद साधला व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले .
दरम्यान या कार्यक्रमासाठी श्री श्री.सागर कोल्हे-समन्वयक उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर ,
श्री.रोहन बलाक्षे-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर उपजिल्हाप्रमुख , श्री.सागर दादा पाटील-संपर्कप्रमुख युवा सेना सोलापूर ,
श्री.प्रितेश दिघे-विद्यार्थी शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख , श्री.शंकर दुधाळ-विद्यार्थी शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख , श्री.अजिंक्य राणा शिंदे विद्यार्थी शिवसेना सांगोला तालुकाप्रमुख , श्री.सुरज काळे-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष
सांगोला तालुकाप्रमुख , श्री आदित्य शेगावकर-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सांगोला शहर प्रमुख श्री.रविराज शिंदे-बलवडी उपसरपंच इत्यादी पदाधिकारी व असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या...!
0 Comments