खळबळजनक...सांगोला तालुक्यात महसूल'च्या पथकास वाळू तस्करांची दमदाटी; शासकीय कामात अडथळा; दोघांवर गुन्हा दाखल
सांगोला:- आगलावेवाडी याच्यासह टेम्पो चालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार
जवळा मंडल अधिकारी व्ही. बी जाधव, गावकामगार तलाठी दिग्विजय पाटील, तलाठी एस. बी. डाखोरे, महसूल सेवक प्रकाश चव्हाण, चालक डी. सी. काळे यांचे पथक सरकारी वाहनाने गस्त घालत होते.
सोनंद जवळील कोरडा नदीवरील सोनंद बंधाऱ्याजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास एक ४०७ टेम्पो अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना मिळून आला. महसूल विभागाच्या पथकाने टेम्पो चालकास नाव, पत्ता विचारले असता
त्याने नाव व पत्ता सांगितले नाही. त्यानंतर तलाठी पाटील यांनी स्वतःची ओळख सांगून टेम्पो पुढील कायदेशीर कारवाईसाठी सांगोला तहसील कार्यालयाकडे घेण्यास सांगितले.
चालक टेम्पो घेऊन सांगोल्याकडे घेऊन येताना सोनंद गावच्या हद्दीत मागून दुचाकीवरून दोन व्यक्ती टेम्पोजवळ येऊन चालकास टेम्पो थांबविण्यास सांगितले. चालक टेम्पोतून उतरताना तलाठी पाटील यांनी, तू टेम्पो घेऊन चल, असे सांगितले.
यावर, मी येत नाही तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणाला. तर दुचाकीवर आलेल्या एकाने स्वतः टेम्पो चालविण्यास घेतला आणि टेम्पो सरळ तुकाराम गावडे यांच्या घरासमोरच थांबणार, असे सांगितले.
तलाठी पाटील हे त्याला गाडी थांबव, असे म्हणत असताना टेम्पो चालकाने तलाठी पाटील यांना धक्का मारून बाजूला केले व तुला बघून घेतो, तुला कोणाला फोन लावायचा ते लाव,
तुम्हाला सोडणार नाही, अशी दमदाटी व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. टेम्पो तसाच पुढे जवळा रोडने जवळा, आगलावेवाडी येथे आणून
गावडे यांच्या घरासमोर टेम्पो उभा करून तो पळून गेला. तलाठी पाटील यांनी उपस्थित लोकांकडे चौकशी केली असता, पळून गेलेला व्यक्ती रामचंद्र आगलावे असल्याचे समजले, अशी फिर्याद तलाठ्याने दिली.
0 Comments