जय मल्हार क्रांती संघटनेच्या वार्षिक आढावा बैठकीच्या नियोजनासाठी सोमवारी सांगोल्यात बैठकीचे आयोजन !
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी ; १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ११:०० ते ३ या वेळेत.श्री. गणेश मंगल कार्यालय महुदरोड सांगोला येथे जय मल्हार क्रांती संघटनेची वार्षिक आढावा बैठक आयोजित केली आहे.
सदर कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे व महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या वार्षिक आढावा बैठकीच्या नियोजनासाठी
सांगोला तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी सांगोला येथील श्री. अंबिका मंदिरात सोमवार दि.६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १:०० वा. वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश मंडले यांनी केले आहे.
तसेच या आढावा बैठकीत नवीन पदाधिकारी यांच्या निवडी केल्या जाणार आहेत.जय मल्हार क्रांती संघटनेत काम करण्याची आवड असणाऱ्या इच्छुक समाज बांधवांनी 99223 99588,97303 70888,9011279964
या नंबर वर संपूर्ण साधावा असे अवाहन करण्यात येत आहे.तसेच या कार्यक्रमात जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांची उमाजी नाईक आर्थिक विकास
महामंडळाच्या उपाध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) निवड झाल्याबद्दल व सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व समाज बांधवांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
0 Comments