सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..
लघुशंकेच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, नेमकं काय काय घडलं?
सांगोला : लघुशंका करण्याच्या किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. ही घटना दिनांक १६ डिसेंबर रोजी सांगोला शहरातील मुजावर गल्ली येथे घडली आहे.
याबाबत, फिरदोस अल्लारखा खतीब (रा.मुजावर गल्ली, सांगोला) व पंडित बळीराम सुरवसे (रा. कडलास नाका, सांगोला) यांनी गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी सांगोला पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलिसांनी पंडित सुरवसे, अमित सुरवसे, सुधीर वर्मा यांच्यासह दोघा अज्ञातांवर तसेच मोहसीन खतीब, अल्लारखा खतीब, मोहम्मद मुलाणी यांच्यासह पाच अज्ञातांवर गुन्हा दाखल केला.
पंडित सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास संशयित मोहसीन खतीब, त्याचा भाऊ अल्लारखा खतीब,
मोहमद मुलाणी इतर ४ ते ५ जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत तुला बघून घेतो असे सुरवसे यांना व त्यांचा मुलगा अमित सुरवसे यांना लोखंडी सळईने, हातांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तर फिरदोस अल्लारखा खतीब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खतीब यांच्या घराच्या बाजूला पंडित सुरवसे यांचा कामगार सुधीर वर्मा हा लघुशंका करीत होता.
त्यावेळी खतीब यांच्या पतीने त्याला जाब विचारला असता पंडित सुरवसे, अमित सुरवसे, सुधीर वर्मा व अज्ञात दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments