google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरे येथे वीरभद्र जयंती सोहळा संपन्न वीरशैव धर्माचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे - राय पाटणकर महास्वामीजी

Breaking News

नाझरे येथे वीरभद्र जयंती सोहळा संपन्न वीरशैव धर्माचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे - राय पाटणकर महास्वामीजी

नाझरे येथे वीरभद्र जयंती सोहळा संपन्न वीरशैव धर्माचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे - राय पाटणकर महास्वामीजी




(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नाझरे प्रतिनिधी  जीवन हे सुंदर आहे व त्यात अध्यात्माची भर टाका म्हणजे अजून सुंदर होईल परंतु व्यसनापासून सर्वांनी दूर राहा व वीरशैव धर्माचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे आहे व धर्माची पताका आनंदाने फडकवा असे 

श्री श्री 108 श्री गुरु महादया रविशंकर शिवाचार्य राय पाटणकर महाराज यांनी वीरभद्र मंदिर नाझरे ता. सांगोला येथे जयंती सोहळा संपन्न प्रसंगी आशीर्वाचनात सांगितले. 

       महाराष्ट्र ही संतांची भूमी असून जर साधुसंतावर व मठावर अन्याय करणार कोण असेल तर आम्हास ही सर्व काही चालवता येते परंतु गुरुपरंपरेने आम्ही शांत, विनम्र आहोत व याचा फायदा कोणी घेऊ नये. 

तसे सर्वांनी शिकून मोठे व्हा व बालपणापासून आमच्यावर चांगले संस्कार झाले व कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही आजपर्यंत सेवा करीत आलो व यापुढेही करू व धर्माचे आचरण

 करा व जयंतीनिमित्त विरभद्राचा तुम्हास आशीर्वाद लाभो. तसेच स्वामी, जंगम या नवीन पिढीने कार्यरत रहा असा मौलिक सल्लाही राय पाटणकर महास्वामींनी यावेळी दिला. 

       सुरुवातीस कारंडेवाडी येथील मा. सरपंच रावसाहेब चौगुले यांच्या शुभहस्ते महास्वामींचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षक शिवया स्वामी व सेवानिवृत्त टेलिफोन अधिकारी शिवानंद स्वामी यांनी गुरुचे महत्व सांगितले.

 तसेच नाझरे गावातून श्रीच्या पालखीची व महास्वामी ची वाजत गाजत तसेच पुरंत यांनी शस्त्रे टोचून व वीरभद्राच्या जयजयकार करून मिरवणुकीत रंग भरला. 

यावेळी वीरभद्र महाराज की जय, हर हर महादेव, राय पाटणकर महास्वामी की जय इत्यादी जयघोष करण्यात आला. तसेच सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी रवीराज शेटे यांची निवड 

झाल्याने त्यांचाही महास्वामीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच यावेळी नाझरे, वझरे, कारंडेवाडी येथील शिवभक्त, महिला, आबालवृद्ध, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments