सांगोला तालुक्यातील लायसन परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : चेअरमन समाधान पाटील
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणारे डाळिंबाची खरेदी आणि विक्री आता शहरातील भर रस्त्यावर होऊ लागली आहे. यामुळे बाजार समितीला आर्थिक फटका बसत
असल्याने व शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला सांगोला तालुक्यातील डाळिंबी व्यापारी व परराज्यातील व्यापाऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती ॲक्शन मोडवर आली आहे.
लायसन परवानाधारक नसलेल्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा चेअरमन समाधान पाटील यांनी दिला आहे.
डाळिंबाचे कोठार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यात डाळिंबाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परराज्यातील व्यापारी सांगोला मध्ये वास्तव्यास आहेत. या व्यापाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन डाळिंब खरेदी केले जाते.
तर अनेक व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सोयी नुसार डाळिंब खरेदी आणि विक्रीचा व्यवहार सुरू केला आहे. यामध्ये चिंचोली रोड वर प्रामुख्याने डाळिंबाचा बाझार सुरू झाला आहे. सांगोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना,
व त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी शेड व गाळे उपलब्ध केले असताना, व्यापाऱ्यांनी याकडे पाठ फिरवत शहरात विविध ठिकाणी डाळिंबाचा खरेदी विक्रीचा बाजार सुरू केला आहे. याचा आर्थिक फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे.
बाजार समितीचे अधिकारी व व्यापारी यांच्यात गुरुवारी बैठक
मा. समाधान पाटील, चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला सांगोला पोलीस स्टेशन, नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी यासह डाळिंब व्यापारी यांची येत्या गुरुवारी बैठक बोलवण्यात आली आहे.
या बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यासह ज्या डाळिंब व्यापाऱ्याकडे लायसन परवाना नाही अशा व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे.


0 Comments