google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 न्यू इंग्लिश स्कूल चे माध्यमिक शिक्षक निलकंठ लिंगे यांची २७ वर्षे सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती..

Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल चे माध्यमिक शिक्षक निलकंठ लिंगे यांची २७ वर्षे सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती..

न्यू इंग्लिश स्कूल चे माध्यमिक शिक्षक निलकंठ लिंगे यांची २७ वर्षे सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहरातील न्यूइंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला चे माध्यमिक शिक्षक निलकंठ लिंगे यांनी २७ वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे स्वेच्छानिवृत्ती निमित्त सांगोला तालुका शिक्षण

प्रसारक मंडळ सांगोलाचे संस्था अध्यक्ष डॉ अनिकेत देशमुख व संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. निलकंठ लिंगे यांना लहाणपणापासून सामाजिक कार्याची आवड आहे त्यांचे सर्व

कुटुंब वारकरी सांप्रदायाचे सेवेकरी आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला शहरात झाले सन १९८० ते १९८४ जि प प्राथमिक शाळा नं एक सांगोला सन १९८४ ते १९९२ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे बारावी सन १९९२ ते १९९५ डॉ आ. गणपतराव देशमुख महाविद्यालय

 सांगोला येथे बीएस्सी शिक्षण झाले बी. एस्सी विद्यापीठ गुणवत्ता यादीत आले महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालय अकलूज येथे बी एड चे शिक्षण झाले बी एड परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला 

अकलूज येथे आनंदयात्रा मध्ये तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांचे हस्ते सत्कार झाला २७ वर्षे सेवेत गणित विषयाचे अध्यापन करीत असताना असंख्य गुणवंत विद्यार्थी घडविले अनेक विद्यार्थी सध्या

 डॉक्टर इंजिनिअर वकील व प्रशास इंजिनिअर वकील व प्रशासकीय सेवेत आहेत दर रविवारी जादा तास, प्रत्येक प्रकरणावर टेस्ट हे सरांचे वैशिष्ठ होते शाळेत सांस्कृतिक विभाग, पालक शिक्षक संघ, प्रसिध्दी विभाग यामध्ये योगदान होते असंख्य 

गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली सामाजिक कार्यात सर अग्रेसर होते त्यांनी विविध पदाची जबाबदारी घेऊन योगदान दिले जिल्हाध्यक्ष गणित मंडळ, जिल्हाध्यक्ष विज्ञान मंडळ, जिल्हा उपाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ, अध्यक्ष रोटरी क्लब, 

आजीव सदस्य आपुलकी प्रतिष्ठान, उपाध्यक्ष साने गुरूजी कथामाला, सदस्य वारकरी सांप्रदाय मंडळ या विविध संघटनेत योगदान दिले त्यांनी स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आयुष्यात सामाजिक कार्य करत राहणार असे मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments