आबासाहेबांना जयंती दिनी विनम्र अभिवादन व निष्ठेचा लाल सलाम...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आबासाहेब माणस तीच मोठी असतात जी आपल्या जीवनात धन-दौलत मिळवतात, मोठ मोठ्या पदावर जावून आभाळाला गवसणी घालतात..
पण आबासाहेब तुम्ही मोठे होता आपल्या तत्वांनी,एकनिष्ठ विचारांनी, तुमच्या जगण्याच्या आदर्शवत पध्दतीने तुम्ही आभाळचं होता सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी व निराधार लोकांच.. हेच तुमचं मोठे पण होतं
आबासाहेब तुम्ही जिथे होता व आहात ती उंची व ते मोठेपण कधीच कोणी गाठणार नाही.. हेच सत्य.. राजकारणातून समाजकारण करत निस्वार्थ जनतेची सेवा करणारा एकमेव नेता जर कोणी असेल तर तुम्हीच आबासाहेब...
“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" या शब्दाशी अगदी तंतोतंत जुळणार तुमच कार्य होत.. म्हणूनच तुम्ही आमच्या साठी दैवत होता आहात व कायम राहणार..
आबासाहेब तुम्हाला जयंती दिनी विनम्र अभिवादन व निष्ठेचा लाल सलाम.... तुमचे विचार,तुमची निष्ठा या सांगोला तालुक्यात तुम्ही जोडलेल्या माणसांन मध्ये व निष्ठावंत कार्यकर्त्यांनमध्ये कायम राहील..
तुमच्या अपार उपकारातून उत्तराई होण्यासाठी एक दिलाने व एकजुटीने तुमचा वासरदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठवून हा लाल बावटा सांगोल्यात फडकवल्याशिवाय तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता राहणार नाही.... हिच तुम्हाला खरी आदरांजली ठरेल...*
*:- वैभव पाटील*


0 Comments