७८ व्या स्वातंत्र्यदिनी फडकणार माऊंट युनामवर तिरंगा सांगोला मधील (वाढेगाव) वैभव ऐवळे करणार माउंट यूनाम सर...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मूळचे वाढेगावं (सांगोला) आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे यांनी माउंट
युनाम (६११० मी./२००४५ फूट) ही मोहीम आखली आहे. स्वातंत्र्यदिनी हे उंच शिखर सर करत तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिवस साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे.
माउंट युनाम हे शिखर समुद्रसपाटीपासून ६११० मीटर वरती आहे. हाई अलटीट्युड, बर्फाळ हवेचा वेग, मोरेन्स आणि स्क्रीचा मार्ग यामुळे हे शिखर अवघड आणि अनुभवी गिर्यारोहकांसाठी आहे.
८ ऑगस्टला ते मुंबईतून रवाना होत आहेत आणि १५ ऑगस्ट, २०२४ रोजी युनाम शिखरावर भारतीय ध्वज फडकावून व राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहेत.
यापूर्वी वैभव यांनी माउंट किलीमंजारो (अफ्रिका खंडांतील सर्वोच्च शिखर), माऊंट एलब्रस (युरोप खंडातील सर्वोच्च शिखर), माऊंट जो जांगो (लडाख), कांग यात्से 2 ( लडाख), UT कांग्री (लडाख) अशी शिखरे यशस्वीपणे सर केलेली आहेत.
मोहिमेबद्दल माहिती देताना वैभव म्हणाले की ,२०१८ पासून ते स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. २०१८ ला माऊंट किलीमांजारो, २०१९ ला माऊंट एल्ब्रस,
२०२१ ला माऊंट कांग यातसे, २०२२ ला माऊंट जो जंगो, २०२३ ला UT कांगरी या शिखरावरती तिरंग्यांचे ध्वजतोरण फडकवत त्यांनी देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला होता.
या मोहिमांची नोंद गिनीज बुक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस,आशिया बुक ऑफ रेकॉर्डस अशा नामांकित रेकॉर्ड बुक्समध्ये झाली आहे. सदर मोहीम वैभव ऑर्गन डोनेशनला प्रमोट करण्यासाठी करत आहेत.


0 Comments