मोठी बातमी...लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून शरद पवार यांची विधानसभेची मोर्चे बांधणी
देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. देशात भाजपा युती विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये थेट लढत होतं आहे. तर राज्यात महायुती विरुद्ध महाविकास असा थेट सामना होत आहेत.
राज्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष लोकसभेच्या दहा जागा लढत आहे. लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून खासदार शरद पवार हे विधानसभा निवडणूकीचे मोर्चे बांधणी करत आहेत.
सोलापूर जिल्हातील सांगोला, करमाळा आणि माळशिरस विधानसभा मतदार संघात धनगर समाजाचे आमदार निवडून आणण्यासाठी
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसलीय. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार नारायण आबा पाटील आणि उत्तम जानकर यांनी माढा लोकसभेसाठी शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
माढा लोकसभा मतदार संघात भाजपा कडून उमेदवारी न मिळाल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते.
तर सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने उत्तम जानकर नाराज होते. तीस वर्षे एकमेकांविरुद्ध राजकारण करणारे मोहिते पाटील आणि जानकर यांना एकत्र आणण्यात शरद पवारांना यश आले.
करमाळ्याचे माजी आमदार मोहिते पाटील समर्थक नारायण आबा पाटील यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सांगोला तालुक्यात शेकापच्या माध्यमातून
डॉ. बाबासाहेब देशमुख हे महाविकास आघाडी सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना समर्थन दिले.
त्यामुळे मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला माढा लोकसभेत दगडा उमेदवार मिळणं मुश्किल वाटतं होते.
मात्र नाट्यमय घडामोडीनंतर मोहिते पाटील कुटुंबाने शरद पवार पक्षात प्रवेश केला. मोहिते पाटलांबरोबरच सांगोल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख करमाळ्याचे
माजी आमदार नारायण आबा पाटील आणि माळशिरसची धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी शरद पवारांना साथ दिली.
भाजपला माढ्यात टक्कर देण्यासाठी धनगर समाजाचे हे तीन नेते शरद पवार पक्षासाठी महत्त्वाचे आहेत. माढा मतदारसंघात धनगर समाजाचा प्राबल्य आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख, करमाळ्यातून माजी आमदार नारायण आबा पाटील आणि माळशिरस मधून उत्तम जानकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सोशल इंजिनिअरिंगचा नवा फार्मूला शरद पवार यांनी मांडला आहे. एकाच जिल्ह्यातून तीन धनगर
आमदार पाठवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने कंबर कसली आहे. याचा फायदा शरद पवार यांना सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी देखील होणार आहे.
तसेच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये या तीन धनगर समाजाच्या नेत्यांची ताकद मिळाल्याने भाजपा समोर कडवे आव्हान उभा करण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यशस्वी झाला आहे.
0 Comments