google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...माढ्यात 50 वर्षाचे राजकीय विरोधक एकत्रत येणार.

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...माढ्यात 50 वर्षाचे राजकीय विरोधक एकत्रत येणार.

ब्रेकिंग न्यूज...माढ्यात 50 वर्षाचे राजकीय विरोधक एकत्रत येणार. 


माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून माळशिरस तालुक्याच्या राजकारणात कट्टर राजकीय विरोधक

 असलेले मोहिते पाटील आणि पानीवचे प्रकाश पाटील एकत्रित येण्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीला हा मोठा धक्का मानला जातोय.

माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे वडील कै. शंकराव मोहिते पाटील यांचा शामराव पाटील यांनी 1977 साली 

माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव केला होता. तेव्हापासून मोहिते पाटील आणि पाणीचे पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर होते.

अकलूजचे मोहिते पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे महाविकास 

आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी राजकीय वैर संपवून मोहिते पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

असे असले तरी कोणापुढे झुकून किंवा आमचा मानसन्मान घाण टाकून सत्तेच्या पाठीमागे आम्ही जाणार नाही अशी भूमिकाही त्यांनी यावेळी घेतली आहे.

धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यानंतर आता मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक असलेले प्रकाश पाटील यांनीही

 मोहिते पाटलांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे. माढ्यामध्ये आता महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments