सांगोला तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई व चारा टंचाई याबाबत तत्काळ उपाययोजना करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुका व परिसरात सन २०२३-२४ या वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने सद्यपरिस्थितीमध्ये संपूर्ण सांगोला तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
यामुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरती पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे.सध्यस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वनवण फिरावे लागत आहे.
विहरीच्या पाण्याने खालची पातळी गाठली आहे.तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासाठीच्या योजना आहेत त्या सुध्दा नित्याने चालत नाहीत.
आज काही गावांमध्ये सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत परंतु त्यास मर्यादा आहेत...
प्रशासकीय पातळीवरती पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ताबडतोब योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच गेल्या काही काळात
तालुक्यातील पशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असुन,पाऊसाच्या अनियमीत पणामुळे व कमी प्रमाणामुळे शेती व्यवसाय पुर्णतः
अडचणीत आला आहे.आशा परिस्थितीचा सारासार विचार करुन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात दुध व्यवसायाकडे वळाला आहे .
पशुपालकांना अपुर्या पर्जन्याअभावी पशुधन जगवण्याची पुढील काळात मोठी कसरत करावी लागणार आहे.
तरी पशुधन वाचवण्यासाठी शासन पातळीवर लवकरात लवकर चाऱ्याची व्यवस्था करून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा
अन्यथा याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
सदरचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.
सदरचे निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,मा.पालकमंत्री, मा.जिल्हाधिकारी व मा.प्रांताधिकारी यांना देण्यात आले
असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन देतेवेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी - कार्यकर्ते तसेच विविध दूध उत्पादक
संस्थेचे चेअरमन व सदस्य, विविध संस्थेचे चेअरमन व संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली


0 Comments