google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..भावकीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे मेव्हण्याकडून तरुणाचा निर्घृण खून सांगली जिल्ह्यातील घटना...

Breaking News

खळबळजनक..भावकीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे मेव्हण्याकडून तरुणाचा निर्घृण खून सांगली जिल्ह्यातील घटना...

 खळबळजनक..भावकीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे मेव्हण्याकडून तरुणाचा निर्घृण खून सांगली जिल्ह्यातील घटना...


तासगाव; : भावकीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे सावळज (ता. तासगाव) येथील भारत ऊर्फ संतोष संजय पाटील (वय 29) याचा निर्घृण खून करण्यात आला.

 ही घटना बुधवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. प्रेमविवाहामुळे चिडून संतोषचा मेव्हणा ओंकार शिवाजी पाटील याने खून केल्याचे मृताची आई वैशाली संजय पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 ओंकार आणि अन्य नातेवाईकांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत तासगाव पोलिसातून मिळालेली माहिती अशी : संतोष हा ट्रॅक्टरचालक होता.

 सावळज-बिरणवाडी रस्त्यावरील मळ्यात कुटुंबासह तो राहत होता. बुधवारी सायंकाळी तो घरातून बाहेर गेला होता. पण रात्री तो उशिरापर्यंत घरी आला नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता,

 घराकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर संतोष जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्याला पाठीमागे जोराचा आघात झालेला होता. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. 

नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात हलविले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

ज्या ठिकाणी संतोष जखमी आढळला, त्याठिकाणी त्याची दुचाकी होती. हल्लेखोराने त्याच्या डोक्यात, पाठीमागे मारल्याने डोक्यात मोठी जखम होती. 

पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. 

तसेच संशयितांच्या घरांची झडती घेतली. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत.

अडीच वर्षांपूर्वी भावकीत विवाह संतोष याने भावकीतीलच एका मुलीशी अडीच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. 

त्यावेळेपासून या दोन कुटुंबात कटुता आहे. त्यातूनच ही घटना घडली का, याशिवाय खुनामागे अन्य काही कारण आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments