उजनीच्या उजव्या कालव्याचे पाणी बंद; उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सोलापूरवर जलसंकट
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मायनस 11 टक्क्यांपर्यंत गेले असून, धरणातील मृतसाठा 54.30 टीएमसी आहे.
गेल्यावर्षी उजनीत 76.28 टक्के इतका पाणीसाठी होता. एन उन्हाळ्यात जलसंकटाला तोंड देण्यासाठी शेतीसाठी सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी गुरुवारी बंद करण्यात आले
असून, येत्या चार दिवसांत धरणाचे सर्व दरवाजे बंद होणार आहेत.जिह्यात यंदा दुष्काळी स्थिती आहे. माढा, बार्शी, करमाळा, अक्कलकोट, माळशिरस,
सांगोला या तालुक्यांत दुष्काळ स्थिती आहे. जमिनीतील पाण्याची पातळी एका मीटरने खालावली असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासूनच पाणीटंचाईला झळा बसत आहेत.
संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज घेऊन मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावात पाणी सोडले जाणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत डाव्या कालव्यामध्ये सोडण्यात येणारे पाणी पूर्णतः बंद केले जाणार आहे.
पाणी कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचनमधून अपेक्षित वेगाने सध्या जात नाही. त्यामुळे सध्या शेतीसाठी शेवटचे आवर्तन होते. आता पावसाळ्यापर्यंत शेतीसाठी पाणी मिळणार नाही.
सोलापूर, बारामती, कर्जत, जामखेड, इंदापूर व धाराशिव या शहरांसह एमआयडीसी, सोलापूर जिह्यातील 100हून अधिक गावे व शहरांचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठा आता पिण्यासाठीच राखीव असणार आहे.
सोलापुरासाठी तीन आवर्तने उजनी धरणातील पाणीसाठा फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवला जाणार आहे.
सोलापूर शहरासाठी पावसाळ्यापर्यंत तीन आवर्तने असून, एका आवर्तनासाठी उजनीतून भीमा नदीद्वारे सहा टीएमसी पाणी सोडावे लागते.
औज बंधाऱयात आलेले दोन टीएमसी पाणी दोन महिन्यांपर्यंत पुरते. मार्च, मे आणि पाऊस लांबल्यास जून अखेर एक आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


0 Comments