शिवजयंती राष्ट्रीय सण घोषित करावा :-अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे 9503487812
शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय सन म्हणून मान्यता देण्यात यावी, साजरा करावा या मागणीचे निवेदन सांगोल्यातील
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने तहसीलदार सांगोला यांना देण्यात आले.
देशाच्या सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय तसेच आर्थिक सांस्कृतिक इतिहास शिवरायांशिवाय पूर्ण होत नाही.
प्रजेच्या हितासाठी राज्यकारभार करून स्वातंत्र्य निर्माण करणाऱ्या शिवरायांचा इतिहास युरोप, अमेरिका ,इंग्लंड ,रशिया व व्हिएतनाम या देशात अभिमानाने शिकवला जात आहे.
गुलामगिरी नष्ट करून मानवतावादी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांचा जन्मोत्सव राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्यास भारतीयांमध्ये प्रखर राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे .
त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर येत असून त्यापूर्वी त्यांनी हा शिवजन्मोत्सव राष्ट्रीय सण साजरा करण्यास संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी कामटे संघटनेने विशेष पत्राद्वारे प्र प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा याकरिता अशोक कामटे संघटनेने यापूर्वी अनेकदा निवेदन दिलेले आहे.
त्याचबरोबर नुकतीच मागणीची प्रत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार शहाजीबापू पाटील यांनाही देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य निर्मितीचे कार्य संपूर्ण विश्व तलावावर ज्ञात असून शिवरायांनी सर्वसमावेशक 12 बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे.
महाराष्ट्र शासन दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करीत असते तोच निर्णय घेऊन शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय सण म्हणून मान्यता देऊन साजरा करण्याचा निर्णय घ्यावा.
श्री नीलकंठ शिंदे सर,
संस्थापक शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना ,सांगोला



0 Comments