google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वारकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाची मागणी

Breaking News

वारकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाची मागणी

 वारकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा


अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाची मागणी

मंगळवेढा (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील काळुबाळुवाडी येथे 15 फेब्रुवारी रोजी एका हॉटेलसमोरील बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी 

तालुक्यातील ज्ञानू बाळू पाटील (वय वर्ष 52) रा.म्हसोबा हिरणी जि.बेळगाव येथील वारकरी भाविकांचा अज्ञात वाहन

 सांप्रदायीक वारकरी दिंडीत घुसून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एक वारकरी ठार व पाच वारकरी जखमी केल्याप्रकरणी अज्ञात

 वाहनचालकाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने शुक्रवार

 दि.16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता उपविभागीय कार्यालय येथील नायब तहसिलदार प्रकाश व्ही.सगर यांच्याकडे निवेदनाद्वारे  मागणी करण्यात आली.

कर्नाटक राज्यातील म्हसोबा हिरणी ता.हुकेरी जि.बेळगाव येथील 34 वारकरी दि.15 फेब्रुवारी रोजी रस्त्याने माघ वारीसाठी पायी पंढरपूरकडे निघाले होते. काळूबाळू वाडी ता.सांगोला येथे एका हॉटेलसमोर पोहचले होते. सांप्रदायीक वारकरी दिंडीतील वारकरी ज्ञानू बाळू पाटील 

हे बॅटरीच्या उजेडाच्या सहाय्याने वारकर्‍यांना सुरक्षेसाठी पाठीमागून येणार्‍या वाहनास सावध करत होते. दरम्यान याचवेळी पाठीमागून भरधान वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने दिंडीत वारकर्‍यांना धडक दिली.

या धडकेत दिंडीतील ज्ञानू बाळू पाटील, बाळू शंकर पुजारी, प्रतिभा वसंत पाटील, महादेवी शिवपुत्र तेली, सिमा विनायक सुतार, अशोक गुराप्पा ताधले,

 हे गंभीर जखमी झाले. वारकर्‍यांना धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने तेथून धुम ठोकली. सदरच्या वारकर्‍यांना उपचारासाठी 

सांगोला ग्रामीण रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. वारकरी गंभीर जखमी झाल्याने ज्ञानू बाळू पाटील यांना पुढील उपचारासाठी रूग्णवाहिकेतून पंढरपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

 मात्र उपचार सुरू असतानाच ज्ञानू बाळू पाटील हे मृत्यूमुखी पडले. अन्य पाच वारकरी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांचेवर उपचार सुरू आहेत. तात्काळ त्यांना शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख रूपये देण्यात यावेत 

तसेच मृत्यूमुखी पडलेल्या ज्ञानू बाळू पाटील यांना तात्काळ 5 लाख रूपयांची मदत मिळावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील दीड वर्षापुर्वी सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ सोमवार दि.31/10/2022 रोजी सायंकाळी 7 वाजता वारकरी दिंडीत भरधाव वेगाने कार घुसवून 7 भाविक मृत्यूमुखी पडले 

तर 8 भाविक गंभीररित्या जखमी झाले होते. दि.1/11/2022 रोजी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना अखिल भाविक वारकरी मंडळ पंढरपूर विभागाच्या वतीने

 प्रांत अधिकारी मंगळवेढा यांच्या कार्यालयातून निवेदनही पाठवण्यात आले होते.अपघातातील भाविकांना कोणत्याही प्रकारची अर्थिक मदत अजूनही मिळालेली नाही. 

चालू वर्षी तरी पोलिस अधिक्षक यांनी सांगोला तालुक्याचे पोलिस निरीक्षक यांना तात्काळ आदेश देवून सांगोला तालुका हद्द ते पंढरपूर हद्दीपर्यंत वारकर्‍यांना वाहतुकीचे पोलिस संरक्षण मिळावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर निवेदन देते प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांच्या आदेशाने पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्‍वर भगरे, 

ह.भ.प.अशोक घाडगे, ह.भ.प.दयानंद गायकवाड, ह.भ.प.श्रीशैल्य भेंकी, माजी सैनिक महादेव दिवसे व दत्तात्रय राजमाने आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments