आनंदाची बातमी .... सांगोला यात्रेतील पाळण्यांचे तिकिट झाले स्वस्त...
सर्वांच्याच चेहऱ्यावर फुलले हसूनवीन दर खालीलप्रमाणे पहा..
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला पंचक्रोशीतून सांगोला च्या ग्रामदैवत श्री. अंबिकादेवी यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात यात्रेकरू हे आपल्या लहान बालकांसह कुटुंबाला घेऊन यात्रेमध्ये
एक प्रकारचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी चे आयोजन गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते या यात्रेमध्ये आपल्या लहान मुलांना घेऊन यात्रेकरू मोठ्या संख्येने दाखल होत होते.
आणि या यात्रेमध्ये सर्वांचेच खास आकर्षण म्हणजे पाळणा चे खेळ.. मात्र यात्रेमध्ये आलेल्या पाळणा चालकांनी पाळण्यासाठी
अवाजवी दर आकारणी केल्याची तक्रार अनेक यात्रेकरूंनी दैनिक माणदूत एक्सप्रेस सोबत संपर्क साधून आपली व्यथा मांडली यात्रेकरूंची ही व्यथा पाहून पाळणा दरवाढीच्या विषयी
काल गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी दैनिक माणदुत एक्सप्रेस ने पाठपुरावा करत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल कोर्ट रिसिवर अॅड. संजीव शिंदे, अॅड. राजेंद्र चव्हाण,
अॅड. शिवनाथ भस्मे, अॅड. सारंग वांगीकर यांनी पाळणा चालकांची बैठक तात्काळ घेऊनवाढीव दर न घेता वाजवी दरात सेवा देण्याचे आदेश तात्काळ दिले.
प्रामुख्याने यात्रेमध्ये लहान मुलांसह सर्वांचाच हट्ट असतो तो सर्वात पहिला पाळण्यात बसण्याचा मात्र यात्रेमध्ये आलेल्या पाळणा चालकांनी अव्वाच्या सव्वा दर आकारणी केल्यामुळे यात्रेत येणाऱ्या सर्वांच्या खिशाला मोठ्या
प्रमाणात कात्री लागत होती तर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील यात्रेकरूंना आपल्या लहान मुलांचे हट्ट पुरविण्यासाठी पाळणा चालकांचे दर पाहून लहान मुलांचे हट्ट पुरवताना
मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. यात्रेमध्ये आलेल्या पाळणा चालकांची नियोजन कमिटी बरखास्त होऊन हे यात्रेचे नियोजन कोर्ट रिसिव्हर यांच्याकडून करण्यात
आल्याने यात्रेकरूंनी आपले व्यथा मांडायची तरी कोणाकडे असा सवाल त्यांना पडला होता तर काही यात्रेकरूंनी दै. माणदुत एक्सप्रेस शी संपर्क साधला आणि या प्रश्नाला वाचा फुटली त्यामुळे पुनश्च एकदा सिद्ध झाले की...
प्रश्न कोणताही असोत... उत्तर फक्त दै. माणदुतएक्सप्रेस असा गौरव उद्गार यात्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांसह लहान मुलांच्या चेहऱ्यावर पुनश्च हसू उमटल्याने यात्रेकरू मधून व्यक्त होत आहेत.
नवीन दर खालीलप्रमाणे
टॉवर - ७०/-
पाळणा - ७०/-
ब्रेक डान्स - ६०/-
सलांबी - ७०/-
नावडी - ७०/-
ड्रॅगन ट्रेन - ६०/-
टोरा टोरा - ५०/-
मौत का कुआँ - ५०/-
मिकी माऊस - २०/-
मिनी ट्रेन - २०/-
वॉटर बोट - ४०/-
लहान चक्री - ४०/-
जंपींग - २०/-
७ वर्षे वयाच्या आतील मुलांना मोठा पाळणा फ्री यापेक्षा पाळणा चालकांनी अधिक दर आकारणी केल्यास यात्रेच्या कोर्ट रिसीव्हर्स यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments