google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...सांगोला यात्रेतील पाळणा चालकांच्या मनमानी मुळे यात्रेकरू त्रस्त अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणी; कोर्ट रिसिव्हर ने लक्ष घालण्याची यात्रेकरूंची मागणी

Breaking News

खळबळजनक...सांगोला यात्रेतील पाळणा चालकांच्या मनमानी मुळे यात्रेकरू त्रस्त अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणी; कोर्ट रिसिव्हर ने लक्ष घालण्याची यात्रेकरूंची मागणी

 खळबळजनक...सांगोला यात्रेतील पाळणा चालकांच्या मनमानी मुळे यात्रेकरू त्रस्त अव्वाच्या


सव्वा तिकीट आकारणी; कोर्ट रिसिव्हर ने लक्ष घालण्याची यात्रेकरूंची मागणी

सांगोला :- गेल्या तीन ते चार दिवसांपासून सांगोला येथील ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रा सांगोला शहरात सुरू आहे वर्षभर महिला 

आणि खास करून लहान मुलांना यात्रेची आतुरता लागलेली असते यात्रा म्हणजे यातील प्रमुख आकर्षण हा विविध प्रकारचे पाळणे हे असतात यात्रेमध्ये जाणाऱ्या सर्व यात्रेकरू सोबत कुटुंबातील

 महिला व लहान मुलांची यात्रेत येण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते यात्रेमध्ये लहान मुलांकडून पालकांना हट्ट केला जातो तो सर्वात पहिला पाळण्यात बसण्याचा मात्र यात्रेमध्ये आलेल्या पाळणा चालकांनी

 अव्वाच्या सव्वा दर आकारणी केल्यामुळे यात्रेत येणाऱ्या पालकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागत आहे तर सर्वसामान्य गरीब कुटु ंबातील यात्रेकरूंना आपल्या लहान मुलांचे हट्ट पुरविण्यासाठी पाळणा

 चालकांचे दर पाहून लहान मुलांचे हट्ट पुरवताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात्रेमध्ये आलेल्या पाळणा चालकांकडून मनमानीपणे दर आकारल्याने

 एक प्रकारे यात्रेकरूंची पाळणा-चालकांकडून लूट सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाळणा चालकांच्या मनमानीला या आवर घालणार तरी कोण असा सवाल यात्रेकरून मधून उपस्थित होत आहे.

सांगोला येथील या यात्रेचे नियोजन पूर्वी यात्रा कमिटीकडे असायचे त्यावेळी सर्व समावेशक असे स्थानिक सदस्य या यात्रा कमिटीचे काम पाहत होते.

 त्यावेळी यात्रेकरूंना येणाऱ्या विविध अडीअडचणी तसेच यात्रेत येणाऱ्या व्यापारी व पाळणा व्यवसायिकांना मूलभूत सुविधा तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले जायचे.

आता परिस्थिती बदलली आहे यात्रा नियोजन कमिटी बरखास्त होऊन हे यात्रेचे नियोजन कोर्ट रिसिव्हर यांच्याकडून करण्यात येत आहे त्यामुळे व्यापारी, पाळणेवाले तसेच

 यात्रेकरूंना येणाऱ्या अडीअडचणी सांगायच्या तरी कोणाला ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सोबतच यात्रेमध्ये येणाऱ्याव्यापाऱ्यांकडून कमिटीद्वारे जी रक्कम आकारली जाते.

 त्याच्या मोबदल्यात स्वच्छता तसेच यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धुळीची देखील उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित यात्रा कमिटीची असते मात्र या उपायोजना करणे गरजेचे असताना याकडे कोणाचेच लक्ष नाही.

 यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना तसेच अबाल , वृद्धांना आणि महिलांना धुळीअभावी श्वसनाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे यातून नव्याने श्वसन विकाराचा त्रास देखील अनेकांना होत असल्याचे सांगण्यात आले आहे.


चौकट

पाळणा चालकांच्या मनमानी दर आकारणीला कोर्ट रिसिवर चाप लावणार का ? सांगोला शहर व तालुक्यातील बालचमू सोबतच महिलावर्ग यात्रेची आतुरतेने वाट पाहत

 असतात यात लहान मुलांचे यात्रेतील प्रामुख्याने असणारे आकर्षण म्हणजे विविध प्रकारच्या पाळण्यातील खेळ मात्र यात्रेत आलेल्या पाळणा चालकांनी पाळण्यात

 बसायचे दर अव्वाच्या सव्वा लावल्याने यात्रेकरून मधून मोठी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे तसेच या पाळणा चालकांच्या मनमानीला कोर्ट रिसिवर चाप लावणार का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Post a Comment

0 Comments