सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना...
अल्पवयीन बालिकेशी केला विवाह ; पुढे गोंडस मुलीला जन्म
सोलापूर (प्रतिनिधी) बालिका अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुद्धा सोलापुरातील
विजापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने त्या मुलीबरोबर १० मे रोजी २२ रोजी विवाह केला.
त्यानंतर स्वतःच्या घरात तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.७ जुलै २०२३ रोजी बालिकेने एका मुलीस जन्म दिला आहे.
त्यामुळे सरकारतर्फे आकाश चव्हाण (वय-२६,रा.सोलापूर) याच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात
तब्बल ७ महिन्यानंतर ९ फेब्रुवारी २४ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नामदे हे करीत आहेत.


0 Comments