ब्रेकिंग न्यूज...कोल्हापुरात येणार 9 मंत्री, 43 आमदार, 13 खासदार; 100 हाॅटेलमध्ये 2000 खोल्यांचं बुकिंग
नवाझ शरीफ यांची पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार,पुन्हा संधी कोणाला?
दरम्यान, दीड दिवसांच्या अधिवेशनात तीन सत्र असतील. शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.
त्याची पहाणी आज करण्यात आली. साधारण दोन हजारांहून पदाधिकारी सलग तीन दिवस येथे असतील. पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल.
पक्ष संघटनेच्या आढावा घेतला जाईल. पक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राजकीय ठराव मांडले जातील. त्यावर विचार विनिमय व चर्चा होणार आहे. ते राजकीय ठराव दुसऱ्या सत्रामध्ये मंजूर केले जातील.
तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा होईल. या सत्रात आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने
तयारीबाबतपक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे
व नंतर सत्राचा समारोप होईल. सायंकाळी गांधी मैदानात जाहीर सभेने महाअधिवेशनाची सांगता होईल, असेही पावसकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
100 हाॅटेलमध्ये दोन हजार खोल्यांचे बुकिंग
जिल्ह्यातील सुमारे शंभराहून अधिक हॉटेलमधील दोन हजाराहूंन अधिक खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून झाले आहे.
शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील आमदार, खासदार, उपनेते,
संपर्क नेते, जिल्हा प्रमुख सुद्धा उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, अनेक पदाधिकारी कोल्हापुरात हजर होणार असल्याचीही माहिती क्षीरसागर यांनी दिली.


0 Comments